India Vs New Zealand : मालिका पराभवानंतर मांजरेकरांनी कर्णधाराच्या कार्यशालीबद्दल व्यक्त केली शंका

India Vs New Zealand : : शनिवारी न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ११३ धावांनी पराभव केला. या तीन सामन्याच्या मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या या विजयाने भारताची सलग १८ कसोटी मालिका जिंकण्याची मालिका संपुष्टात आणली. भारतीय संघाचा हा ऐतिहासिक पराभव आहे. न्यझीलंड विरोधातील मायदेशात खेळलेल्या या दोन्ही सामन्यात भारतीय संघाचे वरिष्ठ खेळाडू आपला ठसा उमटवू शकले नाहीत. फलंदाजीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी तर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकी जोडीलाही फारसा प्रभाव पाडता आला नाही.

भारतीय संघाने दोन्ही कसोटी सामन्यात केलेल्या चुका तसेच ढेपाळलेली फलंदाजी याबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावर ताशेरे ओढले जात आहेत. परंतु, संजय मांजरेकर यांनी गौतम गंभीर याची बाजू घेत सांगितले आहे की, मी अजूनही म्हणेन की प्रशिक्षकाचा संघावर सर्वात कमी प्रभाव असतो, तुमच्या 11व्या सर्वात कमकुवत खेळाडूपेक्षा कमी. तो मैदानावर पाय ठेवत नाही, कर्णधार तिथे प्रभारी असतो. रोहित शर्माच्या कर्णधार पदाच्या कामगिरीवरच मांजरेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला झुकते माप दिले आहे.

मांजरेकर यांनी रोहितला सल्ला दिला आहे. संजय मांजरेकर म्हणाले, ‘हे पूर्णपणे विचित्र आहे. रोहित शर्माने ही काळजी घेणे आवश्यक आहे. डाव्या आणि उजव्या हातांच्या संयोजनाबद्दल विचार करणे. मला वाटते की त्यांनी खेळाडूंच्या एकूण गुणवत्तेवर आणि क्षमतेच्या आधारे पुढे जायला हवे (0, 70, 1, 17) 88 धावा केल्या.

रोहित शर्माच्या कर्णधारपदावर मांजरेकर यांनी शंका उपस्थित केली आहे. फलंदाज सर्फराज खान हा फॉर्मात असतांना त्याच्यासमोर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला फलंदाजीसाठी पाठवण्याच्या रोहित शर्माच्या ‘विचित्र’ निर्णयावर मांजरेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो म्हणाला, ‘सरफराज खानला खालच्या क्रमाने फलंदाजीसाठी पाठवणे आणि वॉशिंग्टन सुंदरला त्याच्यावर पाठवणे कारण तो डावखुरा फलंदाज आहे हे चुकीचे असून अशा गोष्टी घडू नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.