India vs New Zealand Second Test: भारत-न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु असून पहिल्या डावात न्यूझीलंडने आघाडी घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. या सामन्यात पहिल्या डावात २५९ धावा केल्या तर टीम इंडियाने या धावसंख्याचा पाठलाग करत केवळ १५६ धावा केल्या आहेत. या सामन्यात न्यूझीलंडने १०३ धावांनी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्मा आपले खाते देखील उघडू शकला नाही. तर यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल यांनी प्रत्येकाने ३० धावा केल्या. विराट कोहली फक्त १ धाव करत बाद झाला. रवीचंद्रन अश्वीनने ४, ऋषभ पंतने १८, रवींद्र जडेजाने ३८, सर्फराज खान ११ , आकश दीपने ६, वॉशिंग्टन सुंदरने १८ तर जसप्रीत बुमराह एकही धाव काढू शकला नाही. न्यूझीलंडकडून सर्वाधिक ७ विकेट्स ह्या मिचेल सँटनरने घेतल्या. तर टीम साऊदीने १ , ग्लेन फिलिप्सने २ विकेट्स घेतल्या.
रचिन व काॅनवे या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. परंतु, वाॅशिग्टन सुंदरने न्यूझीलंडच्या डावाला रोखण्याचे मोठे काम केले. न्यूझीलंड ३ बाद १९७ अशा सुस्थितीत असताना वाॅशिंग्टन सुंदरच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या २५९ धावांमध्ये संपुष्ठात आला.
न्यूझीलंडने ६२ धावांत ७ फलंदाज गमावले. यामुळे टीम इंडियाला पहिल्याच दिवशी मोठे यश लाभले . भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने अवघ्या ५९ धावांमध्ये सात बळी घेतले, तर अश्विनने सुंदर साथ देताना ६४ धावांमध्ये तीन बळी टिपले. न्यूझीलंडचे चार फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.
भारताची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), विराट कोहली, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, सरफराज खान, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप.
न्यूझीलंडचा प्लेइंग इलेव्हन-
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, विल यंग, डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, टिम साऊदी, ग्लेन फिलिप्स, एजाज पटेल, विल्यम ओरुके, मिचेल सँटनर.