जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी कारवाया सुरूच असता. जम्मू-काश्मीरमधील पुंछमधून मोठी बातमी समोर आली आहे. येथे सुरक्षा दलांनी चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार केले आहे. सुरक्षा दलांच्या हाती हे मोठे यश मानले जात आहे.सुरक्षा दलांना या परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर या दहशतवादी कारवाई विरुद्ध सुरक्षा दलांनी स्थानिक पोलिसांसह संयुक्त मोहीम राबवत संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली आणि शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, मात्र त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यामुळेच भारतीय जवानांनी मोर्चा सांभाळत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि लवकरच चकमक सुरू झाली. यावेळी सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, मारले गेलेले दहशतवादी कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही.
जम्मू-काश्मीरच्या भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पूंछमधील सिंधरा भागात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलांमधील पहिली चकमक काल रात्री 11:30 च्या सुमारास झाली त्यानंतर टेहळणी उपकरणांसह ड्रोन तैनात करण्यात आले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार होऊन आज सकाळी पुन्हा चकमक सुरू झाली. भारतीय लष्कराचे विशेष दल, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे कर्मचारी इतर दलांसह या मोहिमेचा भाग होते. कारवाईत ठार झालेले दहशतवादी बहुधा परदेशी दहशतवादी असून त्यांची ओळख पटवली जात आहे.भारतीय सैन्य दलाला खुप मोठे कारवाई केल्याबद्दल कौतुक होत आहे.