नवी दिल्ली : १५ ऑक्टोबर देशाची सैन्यशक्ती आता कितीतरी पटीने वाढणार आहे. ३१ एमक्यू- ९बी प्रिडेटर ड्रोन्स खरेदी करण्यासाठी अमेरिकेसोबत ३२ हजार कोटी रुपयांचा सौदा करण्यात आला. या सौद्यानुसार ड्रोन्सच्या देखभाल, दुरुस्तीसाठी भारतात सुविधा केंद्र उभारले जाणार आहेत. हणजे, या सौद्याचे एकूण मूल्य ३४,५०० कोटी रुपये आहे. या सौद्याच्या अंतर्गत लष्कर, वायुदल आणि नौदलाला ३१ ड्रोन्स मिळणार आहेत.
मागील वर्षी २१ ते २४ जून दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. या कालावधील अमेरिकेने ३१ हेल ड्रोन्सचा प्रस्ताव ठेवला होता. हेल म्हणजे हाय अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स. एमक्यू ९बी हंटर किलर ड्रोन मोठ्या उंचीवर दीर्घकाळापर्यंत उड्डाण करू शकते. या ड्रोनला प्रिडेटर किंवा रीपरही म्हणतात.
एमक्यू-९बी प्रिडेटर जगातील सर्वांत धोकादायक ड्रोन आहे. हे ड्रोन्स चेन्नईत आयएनएस राजाली, गुजरातच्या पोरबंदर येथील नौदल तळावर तसेच वायुदल आणि लष्कर गोरखपूर आणि सरसावा वायुतळावरून संचालित करतील. उड्डाण करण्यासाठी या ड्रोन्सला फार मोठी धावपट्टी लागत नाही. गोरखपूरच्या सरसावा तळावरून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लडाख आणि अरुणाल प्रदेशात नजर ठेवणे सोपे होईल. १५ ड्रोन्स सामुद्री क्षेत्रांत नजर ठेवतील, तर उर्वरित चीन आणि पाकिस्तानी सीमेवर तैनात केले जाणार आहेत.
या ड्रोनच्या मदतीने अल् कायदाचा नेता अल् जवाहिरीचा खात्मा करण्यात आला होता. कोणत्याही मोहिमेसाठी हे ड्रोन पाठवले जाऊ शकते. नजर ठेवणे, हेरगिरी, माहिती मिळवणे किंवा शत्रूवर अचानक हल्ला केला जाऊ शकतो. दीर्घकाळ मोठ्या उंचीवर नजर ठेवणे या ड्रोनला शक्य आहे. १९०० किमीचा पल्ला, १७०० किलो शस्त्रास्त्रे या ड्रोनचा पल्ला १९०० किमी आहे. हे ड्रोन १७०० किलोचे शस्त्रास्त्र सोबत नेऊ शकते. याचे दोन ऑपरेटर्स ग्राऊंड स्टेशनवरून व्हिडीओ गेमप्रमाणे यावर नियंत्रण ठेवतात.
ड्रोनची वैशिष्ट्ये
लांबी – ३६.१ फूट
उंची – १२.६ फूट
वजन – २.२२३ किलो
इंधन क्षमता – १,८०० किलो
वेग – ताशी ४८२ किमी