---Advertisement---

OpenAI वर गंभीर आरोप करणाऱ्या भारतीय इंजिनिअरचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

---Advertisement---

भारतीय इंजिनिअर सुचीर बालाजी, जो OpenAI च्या संशोधन संघाचा भाग होता. चॅटजीपीटी निर्मात्या ओपनएआयच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे सुचीर सध्या चर्चेत आला होता.आणि कंपनीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण पद्धतींविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. २६ वर्षीय सुचीर बालाजी सॅन फ्रान्सिस्कोयेथे त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला आहे.

कोण होता सुचिर बालाजी?

सुचीर बालाजी याने कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले आहे. यानंतर त्याने ओपनएआय आणि स्केल एआयमध्ये इंटर्नशिप केली. ओपनएआयच्या सुरुवातीच्या काळात त्याने वेबजीपीटीवर काम केले. यानंतर, तो GPT-4 च्या पूर्वप्रशिक्षित संघाचा एक भाग बनला.

ओपनएआयमध्ये सुमारे चार वर्षे काम केल्यानंतर त्याने कंपनीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सुचीर म्हणाले की, या तंत्रज्ञानामुळे समाजात चांगल्यापेक्षा वाईट परिणाम अधिक होतील याची जाणीव झाली. OpenAI कथितपणे कॉपीराइट केलेला डेटा कसा वापरत आहे ही त्याची मुख्य चिंता होती.

OpenAI वर सुचीर बालाजीने केलेले आरोप ?

‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत, सूचीर बालाजी यांनी आरोप केला होता की ,OpenAI च्या पद्धती इंटरनेट इकोसिस्टम आणि व्यवसाय आणि लोकांसाठी हानिकारक आहेत. ज्यांचा डेटा कंपनी त्यांच्या संमतीशिवाय वापरत आहे. अनेक लेखक, प्रोग्रामर आणि पत्रकारांनी OpenAI विरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांमध्ये सुचीर बालाजीचे आरोप केंद्रस्थानी आहेत. या लोकांनी दावा केला आहे की OpenAI ने त्यांच्या कॉपीराइट केलेल्या कामांचा ChatGPT प्रशिक्षित करण्यासाठी बेकायदेशीरपणे वापर केला आहे.

मित्रांनी पोलिसांना कळवले

सुचिर बालाजीच्या मृत्यूची घटना २६ नोव्हेंबरची आहे, जी १४ डिसेंबर रोजी उघडकीस आली. रिपोर्ट्सनुसार, सुचीर त्याच्या मित्र आणि सहकाऱ्यांच्या फोन कॉलला उत्तर देत नव्हता. त्याचे सहकारी फ्लॅटवर पोहोचले तेव्हा तो आतून कुलूप होता. यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सुचीरचा मृतदेह आढळून आला.

प्राथमिक तपासात कुठलाही गैरप्रकार झाल्याचे पुरावे मिळालेले नसून, ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा संशय आहे.सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकलने पोलिसांच्या निवेदनाचा हवाला देत म्हटले आहे की, ‘पोलीस अधिकारी वैद्यकीय पथकासह फ्लॅटवर पोहोचले. त्यांना सुचीर बालाजी मृत आढळले. प्राथमिक तपासात चुकीचा कोणताही पुरावा आढळून आला नसून हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment