भारतीय रेल्वेल्वेच्या विविध क्षेत्रीय विभागातील पती-पत्नी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एकाच ठिकाणी नियुक्त करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. संबंधितांच्या बदलीची प्रकरणे तातडीने हातावेगळे करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पती-पत्नी कर्मचार्यांना एकाच ठिकाणी नियुक्त करण्यासंबंधी प्रकि‘येला गती देण्यासाठी क्षेत्रीय विभागाला सूचना देण्यात आल्या असून सदर प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे सांगितले आहे.
मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीच्या (एचआरएमएस) डिजिटलीकरण प्रकि‘येनंतर बदलीसंबंधीचे अर्ज प्रलंबित ठेवता कामा नये. विशेष म्हणजे 20 ऑगस्ट 2022 रोजी रेल्वे मंडळाने पती-पत्नीच्या बदलीसंबंधीच्या प्रकरणांची माहिती मागितली होती. याशिवाय 6 सप्टेंबर 2022 रोजी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व प्रकरणांच्या निपटार्यासाठी विशेष मोहीम करण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, वेगवेगळ्या स्थानकांमध्ये कार्यरत दाम्पत्य असलेल्या कर्मचार्यांनी नियमांनुसार आपण एकाच ठिकाणी नियुक्त होण्यासाठी योग्य असल्याचा दावा केला होता. परंतु, संबंधित विभागांकडून कोणत्याही वैध कारणाअभावी एकत्रीकरणाची प्रकि‘या रोखल्याचा आरोप केला आहे.