प्रवाशांनो लक्ष द्या! अहमदाबाद-बरौनी दरम्यान धावणार ‘ह्या’ विशेष गाड्या

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर आहे. आगमी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही प्रवासाचे नियोजन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. आगामी दिवाळी आणि छठपूजेचा उत्सव लक्षात घेता प्रवाशांची वाढती गर्दी आणि होणारी गैरयोय टाळण्यासाठी रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, रेल्वेने प्रवाशांच्या सोईसाठी  अहमदाबाद ते बरौनी दरम्यान साप्ताहिक उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

सण-उत्सवादरम्यान धावणार या विशेष गाड्या

 

गाडी क्रमांक – ०९४१३/०९४१४ अहमदाबाद-बरौनी-अहमदाबाद स्पेशल (१२ फेऱ्या)

गाडी क्रमांक – ०९४१३ अहमदाबाद-बरौनी स्पेशल दिनांक ०८ ऑक्टोबर २०२४ ते १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रत्येक मंगळवारी अहमदाबाद येथून १६:३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.०० वाजता बरौनी येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक – ०९४१४ बरौनी-अहमदाबाद स्पेशल दिनांक १० ऑक्टोबर २०२४ ते १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत दर गुरुवारी बरौनी ०६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.१५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.

विशेष गाड्यांना असे आहे थांबे

आनंद, वडोदरा, सुरत, उधना, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, सोनपूर, पाटलीपुत्र (पाटलीपुत्र) मार्गे) आणि हाजीपूर स्थानक

संरचना- या विशेष गाड्यांना वातानुकूलित – द्वितीय, ८ वातानुकूलित- तृतीय, ८ शयनयान, २ अनारक्षित डबे, १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसह इतर माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.