---Advertisement---

Indian Railways: ‘या’ वयोगटातील मुलांसाठी रेल्वेचा प्रवास असतो मोफत, जाणून घ्या सविस्तर

by team
---Advertisement---

Indian Railways: भारतीय रेल्वेने लाखो प्रवासी दररोज प्रवास करत असता. प्रवाश्यांसाठी भारतीय रेल्वेने काही नियम बनवले आहेत. रेल्वेने प्रवास करत असतांना आपल्या या नियमांचे देखील पालन करवावे लागते. रेल्वे त्यांच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील करते. या नियमांत तिकीट बुकिंग करताना मुले, महिला, वृद्ध आणि अपंगांना विशेष सवलती दिल्या जातात. वयानुसार, काही मुलांना तिकिट द्यावे लागत नाहीत तर काहींना अर्धे तिकीट द्यावे लागते. यातील एक मुलांच्या तिकिटांबद्दल देखील आहे. अनेक पालक त्यांच्या मुलांसाठी रेल्वे तिकीट खरेदी करावे की नाही याबद्दल खूप गोंधळलेले असतात. आज आपण रेल्वेच्या या नियमाबद्दल जाणून घेणार आहोत.

या वयोगटातील मुलांसाठी अर्धे तिकीट

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर एखादा मुलगा ५ वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल तर त्याच्यासाठी रेल्वे तिकीट खरेदी करण्याची आवश्यकता नाही. पालक या वयाच्या मुलांना त्यांच्यासोबत त्यांच्या सीटवर बसवून प्रवास करू शकतात. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुमचे मूल ५ ते १२ वयोगटातील असेल आणि तुमच्यासोबत रेल्वेमध्ये प्रवास करत असतील, तर तुम्हाला त्याच्यासाठी अर्धे तिकीट घ्यावे लागेल. पण लक्षात ठेवा की मुलांना अर्धे तिकीटात सीट दिली जाणार नाही, जर तुम्हाला मुलासाठी वेगळी सीट हवी असेल, तर तुम्हाला त्याच्यासाठी पूर्ण तिकीट घ्यावे लागेल.

या वयाच्या मुलांसाठी पूर्ण तिकीट

तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या मुलाचे वय १३ वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्हाला त्याच्यासाठी पूर्ण तिकीट घ्यावे लागेल. अर्ध्या तिकिटाचा नियम फक्त ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठीच उपलब्ध आहे.

या वयाची मुले ट्रेनमध्ये मोफत प्रवास करू शकतात

रेल्वेच्या नियमांनुसार, ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाची मुले ट्रेनमध्ये तिकिटाशिवाय म्हणजेच मोफत प्रवास करू शकतात. पालक लहान मुलांना त्यांच्या स्वतःच्या सीटवर बसवून प्रवास करू शकतात. याशिवाय, जर कोणत्याही पालकांना त्यांच्या ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी सीट हवी असेल तर ते अर्ध्या किमतीत तिकीट खरेदी करू शकतात.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment