Stock market closed : आजच्या(5 डिसेंबर) ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला आहे. निफ्टीसोबतच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार वाढ झाली. आयटी सेक्टर मध्ये झालेली वाढ शेअर बाजाराला पोषक ठरली आहे. याचबरोबर टाटा समूहाच्या समभागांमध्येही लक्षणीय उसळी पाहायला मिळाली. आजच्या व्यवहारांती BSE चा सेन्सेक्स 809.53 अंकांच्या वाढीसह 81,765 वर बंद झाला तर, NSE चा निफ्टी 234.90 अंकांच्या 24,702 पातळीवर बंद झाला.
बँकिंग क्षेत्रात तेजी
बँक निफ्टी आज 336.65 अंकांच्या उसळीसह 53,603 स्तरावर बंद झाला. बँक निफ्टीचीही अशीच स्थिती होती आणि 6 समभाग उडी घेऊन बंद झाले तर 6 समभाग घसरणीसह बंद झाले.
BSE सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 27 समभाग तेजीसह बंद झाले. वाढत्या समभागांमध्ये टीसीएस, इन्फोसिस, टायटन, भारती एअरटेल, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग सर्वाधिक उसळी घेऊन बंद झाले.
निफ्टी स्टॉकची स्थिती
जर आपण निफ्टी समभागांवर नजर टाकली तर ट्रेंट, इन्फोसिस, टीसीएस, टायटन आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या समभागांनी उसळी घेतली आहे आणि 50 निफ्टीच्या समभागांपैकी 41 समभाग जोरदारपणे व्यवहार केला आहे. घसरलेल्या समभागांमध्ये एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, बजाज ऑटो, एनटीपीसी आणि ग्रासिमसह व्यवहार बंद झाले.