पाकिस्तान हादरलं! लष्कर-ए-तोएबाशी संबंधित भारताच्या शत्रूची पाकिस्तान मध्ये गोळ्या झाडून हत्या….

---Advertisement---

 

पाकिस्तानातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताकडून दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या मोहम्मद कासिम गुज्जर उर्फ सलमान उर्फ सुलेमान याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना पेशावर परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुज्जर हा आपल्या बाईकवरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर समोरून गोळीबार केला. या हल्ल्यात तो जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे.
मोहम्मद कासिम गुज्जर हा मूळ जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. तो पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा साठी काम करत असल्याचा आरोप होता. गेल्या काही काळापासून तो पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये लपून बसल्याची माहिती भारतीय यंत्रणांकडे होती.
मार्च 2024 मध्ये भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने गुज्जर याला यूएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित केले होते. अधिकृत निवेदनानुसार, भारताविरोधात कट रचणे, दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करणे आणि शस्त्रांची तस्करी यांसारख्या गंभीर आरोपांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले होते. विविध दहशतवादी कारवायांमध्ये त्याचे नाव समोर आले होते.

दरम्यान, त्याच्या हत्येबाबतची माहिती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असली तरी अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. स्थानिक प्रशासनाकडून तपास सुरू असून नेमके हल्लेखोर कोण होते आणि हत्येमागचे कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

ही घटना खरोखरच घडली असल्यास त्याचे प्रादेशिक सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अधिकृत निवेदन येईपर्यंत या वृत्ताकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---