तरुण भारत लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । स्वदेशातील अनेक नागरिक आदिवासी संस्कृती जाणून घेण्यासाठी आदिवासी पाड्यांवर जात असतात, आता मात्र, स्वदेशीयांसह ऑस्ट्रेलियन पर्यटक ही आदिवासी संस्कृती अनुभवण्यासाठी दाखल होत आहेत. रावेर तालुक्यातील पाल येथे ऑस्ट्रेलिया येथील पर्यटक दाखल झाले असून ते या भागातील संस्कृती व आदिवासी नागरिकांची जीवन पद्धती जाणून घेणार आहे.
पाल येथे आलेल्या पाहुण्यांचे अस्सल आदिवासी संस्कृतीप्रमाणे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. शिरीष चौधरी यांच्यासह सातपुडा मंडळाचे सचिव अजित पाटील व अशोक झांबरे, सुधाकर झोपे, शरद वाणी, प्रविण चौधरी, गारखेडा सरपंच रतन बारेला, संजय पवार, उत्तम चव्हाण, हरी चव्हाण, हैदा राठोड, शेवा चव्हाण, करणसिंग पवार, श्रावण पवार व गुलाबवाडी येथील कालिदास चव्हाण स्वागतासाठी सज्ज होते.
त्यांना बंजारा भाषेतील फागगीत व लेगीनृत्य व बंजारा संस्कृतीची व परंपरेची माहिती देण्यात आली. ऑस्ट्रेलियन विद्यार्थीनी नी आदिवासी महिलांचा पेहराव व दागिने परिधान करून संस्कृतीची प्रशंसा केली.
ऑस्ट्रेलियातील पाहुणे
प्रशिक्षक नोबेल जेसन, स्टुअर्ट, लुक , मीना, आर्यन, सॅम, जय, हॅरी, लिटल, स्विनि, मेगन, मधु हे पाहुणे सातपुड्याच्या कुशीत दाखल झाले आहे.