IndusInd Bank: देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली. बँकेचे शेअर्स २25%घसरत लोअर सर्किटवर पोहोचले आणि 52 आठवड्यांचा नीचांक गाठला. सोमवारच्या सत्रात हा शेअर 900रुपयांवर बंद झाला होता. आज 675 रुपयांच्या इंट्राडे नीचांकावर पोहोचल्यानंतर तो लोअर सर्किटवर बंद झाला.
इंडसइंड बँकेचा शेअरमध्ये आज 25 टक्के घसरण होऊन तो 675 रुपयांवर पोहोचला आहे. इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये लोअर सर्किट लागलं आहे. 2020 नंतर इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.
शेअर का कोसळला ?
बँकेच्या हिशोबातील त्रुटींमुळे फॉरेक्स व्यवहारांची अचूक माहिती मिळाली नाही, परिणामी अनेक वर्षांपासून हेजिंग खर्च कमी दाखवण्यात आला. यामुळे डिसेंबर 2024 पर्यंत बँकेच्या नेटवर्थमध्ये सुमारे 2.35% घट झाली आहे. विश्लेषकांच्या मते, बँकेला या त्रुटीमुळे 1,500 कोटी ते 2,000 कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीईओ सुमंत कथपालिया यांनी सांगितले की, ही समस्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान नवीन बँकिंग नियम लागू झाल्यानंतर उघडकीस आली.
तज्ज्ञांचं मत काय ?
तज्ज्ञांच्या मते शेअरची किंमत सध्या खूप घसरण झाली आहे. शेअरमध्ये पुन्हा तेजी कधी येईल, हे बाह्य ऑडिट, नवीन नेतृत्व आणि बँकेच्या गुंतवणूकदारांसाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर अवलंबून असेल. गेल्या काही दिवसांपासून या शेअरवर दबाव होता. गेल्या एका वर्षात बँकेच्या शेअरमध्ये 56% ने घसरण झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात इंडसइंड बँकेच्या भागधारकांना 36% तोटा सहन करावा लागला आहे.
टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
इंडसइंड बँकेचा शेअर कोसळला! एकाच दिवसात 25 टक्के घसरण, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा काय सल्ला ?
by team
Updated On: मार्च 11, 2025 5:22 pm

---Advertisement---