उद्याेगपूरक प्रगतिशील संशाेधन व तंत्रज्ञान

#image_title

business-research-technology आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात भारतातील जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये संशाेधन प्रक्रियेने वेग घेतलेला दिसताे. त्यातच माेदी सरकारच्या ‘नॅशनल रिसर्च फाऊंडेशन’सारख्या नव्या माेहिमेमुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे. त्यानिमित्ताने भारतातील विविध क्षेत्रांतील लक्षवेधी तंत्रज्ञानाधारित संशाेधनाचा हा घेतलेला आढावा! प्रत्येक देशाच्या उद्याेग-विकासाच्या प्रगतीसह एकूणच अर्थकारणाला गती देण्यासाठी अभियांत्रिकी-तंत्रज्ञानासह उद्याेग प्रक्रियेला सातत्याने अधिकाधिक प्रगत व अद्ययावत करण्याची गरज असते. business-research-technology आपला देशही त्याला अपवाद नाही. विशेषत: सद्य:स्थितीत जागतिक स्तरावर वेगाने आपल्या विकासाचा डंका वाजवणाऱ्या भारताच्या आर्थिक-औद्याेगिक संदर्भात तर ही बाब विशेष महत्त्वपूर्ण ठरते. या पृष्ठभूमीवर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नव्यानेच घाेषित केलेल्या देशाच्या संशाेधन क्षेत्रातील कामगिरी व याेगदान विशेष गतिमान करण्यासाठी ‘नॅशनल रिसर्च फाऊंडेशन’ या नव्या माेहिमेचा नव्या संदर्भासह आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.

business-research-technology सकृद्दर्शनी या नव्या संशाेधनप्रधान माेहिमेसाठी आगामी पाच वर्षांसाठी 50 हजार काेटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये उद्याेग-व्यवसायाची नजीकच्या भविष्यासह आगामी काळातील गरजा लक्षात घेऊन व त्याचा अभ्यास करून भारताला संशाेधन-समृद्ध करण्यावर भर दिला जाणार आहे, हे विशेष. याेजनेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी मांडलेली भूमिका म्हणजे आपण संशाेधन क्षेत्रात केवळ पाश्चात्त्यांसह परकीयांचे अनुकरण करणेच पुरेसे नसून देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातील उद्याेगांना आवश्यक अशा ज्ञान-तंत्रज्ञानाच्या गरजांची पूर्तता करण्याचे आव्हान यशस्वीपणे स्वीकारणे गरजेचे आहे. business-research-technology यासाठी त्यांनी आधुनिकता व कल्पकतेच्या आधारे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जाेडीलाच अनुसंधान म्हणजेच संशाेधनाची कास धरण्यावर भर दिला आहे. केंद्र सरकारचा संशाेधनावर भर देणारा हा धाेरणात्मक निर्णय अनेक कार्यांना महत्त्वाचा व दूरगामी स्वरूपात परिणामकारक ठरणारा आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आज आपली आर्थिक-औद्याेगिक प्रगती व परिस्थिती ही उत्साहवर्धक असली, तरी त्याला अद्याप संशाेधनाची पुरेशी साथ मिळालेली नाही. याचाच परिणाम म्हणून भारताला प्रामुख्याने अमेरिकेसारख्या देशावर तंत्रज्ञानापासून अंतराळ संशाेधनासारख्या महत्त्वपूर्ण विषयातील संशाेधन व प्रगत ज्ञान मिळण्यासाठी अवलंबून राहावे लागते. business-research-technology ही बाब केवळ अडचणीची व परावलंबित्वाचीच नव्हे, तर जाेखमीचीसुद्धा ठरू शकते. एरवी जागतिक पातळीवर चर्चेत असणारी ‘अमेरिकन संशाेधन पद्धती’ ही मुख्यत: संशाेधन व त्याचे प्रकाशन याच पद्धतीवर भर देते. परिणामी तिकडे संशाेधनाची भरमार असली, तरी त्याच्या प्रकाशनावर भर देण्यात येत असल्याने व त्याकामी संशाेधक-प्रकाशक मंडळींना भरपूर पैसा-माेबदला मिळत असल्याने या संशाेधनाचा उपयाेग प्रत्यक्ष तंत्रज्ञान वा त्याच्याशी निगडित उद्याेग प्रक्रिया अधिक सुधारित व प्रगत हाेण्यासाठी हाेताेच असे नाही. अधिकांश संशाेधनाचे संशाेधन पत्रिकेमध्ये प्रकाशन व त्यांचे संकलन इथवरच त्यांची मजल असते.

त्यामुळेच इतर प्रगत अथवा प्रगतिशील तुलनेत ‘संशाेधन’ या विषयावर अमेरिका कित्येक पटींनी अधिक खर्च करीत असली, तरी तेथील संशाेधनाचा प्रत्यक्ष उपयाेग अथवा उपयुक्तता मर्यादित स्वरूपातच राहते. याउलट आपल्याकडील ‘दर्प’ म्हणजेच ”Defence Advanced Research Projects Agency” सारखे उदाहरण विशेष उल्लेखनीय म्हणून देता येईल. या संशाेधन प्रयाेगाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, या संशाेधनाचा मूळ विषय व मुख्य संगणक पद्धतीच्या माध्यमातून सार्वजनिक स्वरूपात संबंधितांच्या संदर्भ व अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा अभ्यासक-संशाेधक या उभयतांना हाेत असताे. संशाेधनाचा गाेषवारा संगणकीय पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा हा पायंडा जागतिक संशाेधनाच्या संदर्भात मान्यताप्राप्त ठरला आहे. business-research-technology याचेच प्रमुख उदाहरण म्हणजे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाेलाॅजी मद्रास’द्वारा विशेष जागतिक पुढाकार स्वरूपात भारतीय उद्याेग व शैक्षणिक संशाेधन संस्थांच्या विशेष सहकार्यातून सुरू केलेल्या ‘हेल्थ केअर टेक्नाॅलाॅजी इनाेव्हेशन सेंटर’चे उदाहरण देण्यात येते. या नव्या प्रयाेगात उद्याेगांचा अनुभव, शैक्षणिक संस्थांचे ज्ञान व संशाेधकांचे संशाेधन या तिन्ही महत्त्वपूर्ण मुद्यांचा एकत्रित व एकात्मिक स्वरूपात अभ्यास हाेत असल्याचे त्याचे दीर्घकालीन उपयाेग व परिणाम आता जागतिक स्तरावर हाेताना दिसतात.

चेन्नई येथे ‘आयआयटी’मध्ये प्रस्थापित झालेल्या व जागतिक स्तरावर सक्षमपणे काम करणाऱ्या ‘एचटीआयसी’ संशाेधन केंद्राने अल्पावधीतच उल्लेखनीय काम केले असून त्यामध्ये संशाेधनावर आधारित असे विकसित तंत्रज्ञान अद्ययावत पद्धतीने सर्वदूर पाेहाेचविण्याचा विशेष समावेश करण्यात आला आहे. परिणामी देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय माहिती व त्याच्या उपचार पद्धतीसाठी करता येणारा प्रयाेग आणि उपयाेग आता ग्रामीण व दूरवरच्या वैद्यक-उपचार केंद्रांप्रमाणेच माेबाईल म्हणजेच चालत्याफिरत्या वैद्यकीय केंद्रांना हाेऊ शकताे. business-research-technology ‘मद्रास आयआयटी’चे हे संशाेधन जागतिक स्तरावर अशाप्रकारे क्रांतिकारी ठरले आहे. वैद्यक क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण असे दुसरे उदाहरण म्हणून ‘सुधा गाेपाळकृष्णन् ब्रेन सेंटर’च्या संशाेधन कामगिरीचा उल्लेख केला जाताे. या केंद्राने मेंदू विकार व त्यावरील विशेष उपचार या संदर्भात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेण्याचे नवे व उल्लेखनीय असे काम केले आहे. ‘सुधा गाेपाळकृष्णन् सेंटर’च्या या संशाेधनपर उपक्रमाने पाश्चिमात्य देशातील या क्षेत्रातील संशाेधनावर मात तर केलीच; शिवाय मेंदूशी निगडित उपचार पद्धतीला पण माेठी चालना दिली.

मूलभूत सुविधा व इमारत बांधकाम क्षेत्रात ‘आयआयटी मद्रास’ने जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या तंत्रज्ञानाच्या नावीन्याला व संशाेधनपर तंत्रज्ञानाला पाश्चात्त्य देशांनी आधीच दाद दिली आहे. business-research-technology मुख्य म्हणजे, हे संशाेधन पाश्चात्त्य देशांमध्ये अशा प्रकारच्या संशाेधनासाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत कितीतरी पटींनी कमी आहे. याचाच आर्थिक विराेधाभास की काय, पण आज ‘जागतिक बँक’, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ व पाश्चात्त्य देशातील आर्थिक गुंतवणूक संस्था भारत आणि भारत सरकारला तंत्रज्ञान-संशाेधनावर अधिक खर्चाची गुंतवणूक करण्याचा अनाहूत व फुकाचा सल्ला देत आहेत. या पाश्चिमात्य संस्थांनुसार सद्य:स्थितीत भारताची संशाेधन क्षेत्रातील गुंतवणूक भारताच्या सकल घरेलू उत्पादन म्हणजेच जीडीपीच्या ०.६ टक्के आहे तर अमेरिकेची संशाेधनावरील गुंतवणूक जीडीपीच्या दाेन टक्के आणि चीनची तर तीन टक्के आहे, याचा दाखला दिला जाताे.

business-research-technology अर्थात, याठिकाणी भारताचा संशाेधनावरील खर्च व गुंतवणूक तुलनेने कमी खर्चासह व प्रत्यक्षात अधिक कार्यक्षम स्वरूपात असते. या ऐतिहासिक व व्यावहारिक वस्तुस्थितीला मात्र या पाश्चात्त्य संस्थांकडून साेयीस्करपणे बगल दिली जाते. प्रत्यक्षात आज भारतात सेमीकंडक्टरसह कृत्रिम बुद्धिमत्ता, राेबाेटिक तंत्रज्ञान, सेंसर्स, नॅनाे-टेक्नाॅलाॅजी या अधिकांश क्षेत्रात भारताने यापूर्वीच संशाेधन केले आहे. याशिवाय अंतराळ तंत्रज्ञान यासारख्या प्रगत व खर्चीक क्षेत्रात भारताने केव्हाच यशस्वी आघाडी घेतली आहे. परिणामी भारताच्या प्रचलित व प्रस्तावित संशाेधन गरजा लक्षात घेता, मर्यादित खर्चासह संशाेधन करणे भारताला सहज शक्य आहे. पंतप्रधानांच्या नव्यानेच केलेल्या ‘नॅशनल रिसर्च फाऊंडेशन’च्या संकल्पाने या विषयाला अधिक बळकटी लाभली आहे.

– दत्तात्रेय आंबुलकर 9822847886