बांगलादेशी घुसखोरांना सीमेवरून बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यासाठी राज्यातील दलाल प्रति व्यक्ती १०,००० ते २०,००० रुपये आकारत आहेत, असा आरोप ह्निवट्रेप अचिक नॅशनल मूव्हमेंट (HANM) ने केला आहे. या सामाजिक संघटनेने याबाबत मेघालयचे डीजीपी आई नोंगरांग यांना याबाबत माहिती दिली.
डोंगराळ भाग , नद्या आणि वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारासाठी सोडलेल्या कॉरिडॉरमुळे मेघालयातील सुमारे २० टक्के आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपण नाही. बांगलादेशात हिंसाचार सुरू असताना, मेघालयातील आयएलपी समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांची मोहीम तीव्र केली आहे आणि बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी थांबवण्यासाठी राज्यभरातील त्यांच्या सदस्यांना सतर्क केले आहे.
बांगलादेशी स्थलांतरितांना सीमेच्या खराब किंवा कुंपण नसलेल्या भागातून बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यासाठी राज्यातील दलाल प्रति व्यक्ती १०,००० ते २०,००० रुपये घेत असल्याचा दावा या संघटनेच्या अध्यक्षांनी केला आहे. ही बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न चालू आहेत. पण, तरीही सीमाभागात अतिशय दुर्गम असल्यामुळे यामध्ये अडचणी येतात.