---Advertisement---

विधानपरिषदेच्या सभापतिपदासाठी भाजप आग्रही; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

by team
---Advertisement---

नागपूर : विधान परिषदेत भाजपचा सभापती असावा, असा आग्रह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. याबाबत महायुतीतील ११ घटक पक्षांची चर्चा करावी लागेल, सर्वांशी चर्चा करून एकत्रित निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
 
शुक्रवारी व्हायरल झालेल्या लेटरहेडवरील पत्राबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “भाजप कोर समितीच्या बैठकीत वीसहून अधिक नावांवर चर्चा झाली आहे. कुणीतरी खोडसाळपणा केला असून ते पत्र नाही तर ते एक फक्त पान आहे. कुणीतरी त्यावर ठप्पा मारला आहे. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. त्यात कुठलाही प्रोटोकॉल नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड विधानपरिषदेसाठी चांगले उमेदवार देईल. महाराष्ट्राच्या विकासाकरिता चांगली नावे महाराष्ट्र विधान परिषदेत दिसतील. निवडणुकीसाठी काही लोक अंदाज बांधतात आणि त्यातून याद्या तयार होतात,” असा टोला त्यांनी लगावला.
 
ते पुढे म्हणाले की, “आज महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव कोर ग्रुपची बैठक घेणार आहेत. त्यानंतर निवडणूक व्यवस्थापन समिती बैठक असून महाराष्ट्राच्या निवडणुकीत समोर कसे जायचे यावर चर्चा होईल. १४ तारखेला पुणे येथे राज्याची विस्तृत कार्यकारणी बैठक होईल. त्यात राज्यातील साडेचार हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील,” अशी माहिती बावनकुळेंनी दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment