तरुण भारत लाईव्ह । माधव श्रीकांत किल्लेदार । प्राचीन काळी एक राजा होता. त्याचे राज्य खूप मोठे होते. Samarth leadership राजाला स्वतःचे राज्य वाढवायचे होते. पण त्याला एक दुर्धर आजार झाला होता. अनेक वर्षे राजा त्या आजाराने आजारी होता. राजाच्या उजव्या आणि डाव्या हातातून सतत रक्त यायचे. त्याचा हा आजार अनेक वर्षांपासून त्याला त्रस्त करीत होता. राज्यातील अनेक वैद्यांनी सांगितलेले उपाय राजाने केले. परंतु, तरीही त्याचा आजार पूर्णपणे बरा झाला नाही. त्याच्या रोगाचे निदान होत नव्हते. एके दिवशी राजा शिकारीला गेला. राजा वनात शिकार करीत होता. त्याला तहान लागली. त्याने सैनिकाला पाणी आणण्याची आज्ञा केली. सैनिक पाण्याचा शोध घेण्याकरिता निघून गेला. बराच वेळ झाला, पण तरीही सैनिक पाणी घेऊन आला नाही. राजाने सैनिकाचा शोध घेण्याकरिता काही सैनिकांना पाठवले. त्यांना सैनिकाला शोधून आणण्याची आज्ञा दिली. सैनिक त्या सैनिकाचा आणि पाण्याचा शोध घेण्याकरिता निघाले. परंतु, ते सैनिकही बराच वेळ झाल्यावरही परतले नाहीत. राजा थोडा चिंताग्रस्त झाला. त्याला आश्चर्य वाटले.
सैनिक ज्या दिशेने गेलेत, त्या दिशेने त्यांचा शोध घेण्याकरिता तो निघाला. त्याला प्रचंड तहान लागली होती. राजा वनात त्याच्या सैनिकांना शोधत होता. बराच वेळ झाला होता पण राजाला सैनिक दिसले नव्हते. एका तलावाजवळ राजाला त्याचे सगळे सैनिक मृतावस्थेत आढळले. त्यामुळे राजाला दुःख झाले. तो राजधानीकडे परतत असताना अचानक त्याला एक आश्रम दिसला. त्याने त्या आश्रमात प्रवेश केला. काही वेळाने आश्रमातील ऋषी बाहेर आले. राजाने त्यांना वंदन केले. ऋषींनी राजाला आश्रमात येण्याचे कारण विचारले. राजाने त्यांना घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. ऋषींना राजाच्या चिंतेचे कारण कळले. राजाने त्यानंतर ऋषींना त्याच्या आजारपणाविषयी सांगितले. राजाचा आजार दुर्धर असल्याचे ऋषींना कळले. ऋषींना राजाच्या आजाराचे निदान लागले. ऋषींनी त्याला उपदेश केला. राजाला त्यांनी सांगितले की, Samarth leadership राजा, तुझ्या राज्यातील अशी व्यक्ती शोधून काढ, ज्या व्यक्तीचा हात कापल्यावर तेथून रक्त येत नाही. जेव्हा अशी व्यक्ती तुला भेटेल, तेव्हाच तुझा रोग बरा होईल. तुला या दुर्धर आजारातून मुक्ती मिळेल.
राजाने ऋषींना नमस्कार केला. ऋषींची आज्ञा घेऊन राजा राजधानीला आला. राजाने संपूर्ण राज्यात ज्या व्यक्तीचा हात कापल्यावर रक्त येणार नाही अशा व्यक्तीचा शोध घेण्याची आज्ञा दिली. राजाची ही आज्ञा खूपच विचित्र स्वरूपाची होती. सगळ्या प्रजाजनांना या राजाच्या आज्ञेचे आश्चर्य वाटले. संपूर्ण राज्यात ही वार्ता वार्यासारखी पसरली. राजाने याकरिता विशेष मोहीम राबवण्याचे ठरवले. राजाच्या सैनिकांचे एक पथक रात्रंदिवस कष्ट करून राज्यातील अशा विशिष्ट व्यक्तीचा शोध घेत होते. पण, काही केल्या राजाला यश मिळत नव्हते. राजा या सगळ्या प्रकारामुळे खूप संतापला होता. शेवटी राजाने स्वतःच राज्यात फिरून अशा विशिष्ट व्यक्तीचा शोध घेण्याचे ठरवले. त्याने याकरिता वेषांतर करून शोध मोहीम सुरू केली. राजा राज्यात सगळीकडेच फिरत असे. अतिशय गुप्त पद्धतीने राजाची भ्रमंती सुरू होती. राजाची शोधमोहीम अनेक दिवस सुरू होती.
Samarth leadership या शोधमोहिमेत त्याला राज्याची मूळ परिस्थिती लक्षात आली. राज्यातील मंत्री, प्रशासनातील अधिकारी यांच्या कामाची पद्धत राजाला समजली. त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची राज्याविषयीची निष्ठा, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तीची जाणीव राजाला झाली. राजाला राज्यातील सैनिक, शेतकरी, कष्टकरी, संशोधक, शिक्षक, व्यापारी यांचे प्रश्न समजले. त्या प्रश्नांच्या खोलात शिरून उत्तरे मिळाली. राजाला जाणवले की, आपले राज्य अराजकतेमुळे पोखरले गेले आहे. आपल्या राज्यात अंतर्गत संघर्ष सुरू आहे. परकीय शक्ती खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. शत्रूने राज्यात घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील महत्त्वाच्या पदांवर शत्रुधार्जिणे पदाधिकारी आहेत. ते शत्रू राष्ट्राच्या मोहाला बळी पडून आपल्या नागरिकांना त्रास देत आहेत. सैनिक आणि शेतकर्यांचे जीवन खूप असह्य झाले. कष्टकरी आणि कामगारांचे प्रश्न चिघळले आहेत. शत्रू राष्ट्राच्या साहाय्याने अनेक राष्ट्रविरोधी संस्था-संघटनांचे जाळे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे. राज्यातील तरुणांची बुद्धी भ्रष्ट करून त्यांच्यात अराष्ट्रीयत्व पेरले जात आहे.
राज्यातील बुद्धिमान तरुणवर्ग हा इतर राज्यातील संधींमुळे, स्वतःचे राज्य सोडून जात होता. राज्यातील संशोधकांना कुठलाही वाव मिळत नव्हता. राज्यातील अशुद्ध व्यवस्थेमुळे हे संशोधक वैतागले होते. या संशोधकांनी-वैज्ञानिकांनी लावलेले शोध प्रकाशात येऊ दिले जात नव्हते. त्याचा फायदा कुठल्याही प्रकारे राज्यातील प्रजेला होत नव्हता. राजा हा वर्षानुवर्षे राजमहालाच्या बाहेर कधीही गेला नव्हता. तो अनेक वर्षे सुखासीन आयुष्य जगत होता. त्याच्या स्तुतिपाठकांनी त्याला राज्याच्या मूळ वस्तुस्थितीपासून नेहमीच दूर ठेवले होते. Samarth leadership या सगळ्या प्रकारामुळे राजा राज्याच्या स्थितीबाबत अज्ञानी होता. त्यामुळे लवकरच राज्याचा नाश होणार होता. राज्याची ही परिस्थिती पाहून राजा खूप दुःखी झाला होता. त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. यावर नियंत्रण मिळवायचे त्याने ठरवले. त्याने संपूर्ण राज्यातील राष्ट्रनिष्ठ नागरिकांचे एकत्रीकरण केले. त्यांच्यातील राष्ट्रप्रेम जागृत केले. राज्यांतील सैनिक, शेतकरी, कष्टकरी-कामगारांचे प्रश्न राजाने सोडवले. राज्यातील संशोधक आणि वैज्ञानिक यांना वाव दिला. तसेच त्यांनी केलेले संशोधन आणि लावलेले शोध याचा फायदा प्रजेसाठी करवून घेतला. राज्यातील अशुद्ध आचरण असलेल्या अधिकार्यांचा बंदोबस्त केला. शत्रुधार्जिणे मंत्र्यांना राजाने कठोर शासन केले. राजाने सुरू केलेली मोहीम ही त्या विशिष्ट व्यक्तीचा शोध घेण्यासाठी होती. परंतु, त्या शोधमोहिमेचे रूपांतरण राज्याची घडी नीट बसवण्यात झाली. या सर्व प्रक्रियेत राजा स्वतःचे आजारपण विसरला. त्याच्या हातातून येणारे रक्त थांबले. राजाचा दुर्धर आजार नाहीसा झाला.
एके दिवशी राजा पुन्हा त्या ऋषींच्या आश्रमात आला. ऋषींना त्याने नमस्कार केला. ऋषींनी त्याच्या आजारपणाविषयी चौकशी केली. राजाने ऋषींना त्याचे आजारपण नाहीसे झाल्याचे सांगितले आणि त्याबाबत विचारले. ऋषींनी त्याला सांगितले की, राजा तू ज्या विशिष्ट व्यक्तीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण राज्य पालथे घातले अशी व्यक्ती तुला कुठेही मिळणार नव्हती. Samarth leadership ऋषी पुढे म्हणाले की, राजा हा प्रजेचं पालन करणारा असतो हे तू विसरलास. यामुळे तुझ्या राज्यात अराजक निर्माण झाले. त्यामुळे तुला हा दुर्धर आजार झाला. तू व्याधिग्रस्त झालास. प्रजेचे दुःख-कष्ट तुला जाणवले नाही. त्यानंतर ऋषी असे म्हणाले की, परकीय शक्तींच्या विळख्यात सापडलेले राज्य तुला दिसले नाही. विश्वासघातकी स्तुतिपाठक तुझा घात करीत होते. परंतु, सुखासीन आयुष्य आणि ऐश्वर्य उपभोगत असलेल्या तुला हे कळत नव्हते. तुला झालेला रोग हे तुझ्या अशक्त, कमकुवत आणि निराधार राज्याचे प्रतीक होते. परंतु, जेव्हा तू संपूर्ण राज्याची घडी नीट बसवलीस आणि तुझ्या पूर्वजांच्या काळातील सक्षम राज्याची पुनर्स्थापना केलीस तेव्हाच तुझा आजार नाहीसा झाला. राजा, आता तू दिग्विजय करू शकतोस. कारण समर्थ नेतृत्व तुझ्यात निर्माण झाले आहे. तुझे कल्याण असो.
याविषयी श्रीसमर्थांनी श्रीमद्दासबोध ग्रंथातील 15 व्या दशकातील 6 व्या समासात असे म्हटले आहे की,
बहुतीं कांहींतरी सांपडे । विचक्षण लोकीं मित्री घडे ।
उगेच बैसतां कांहींच न घडे । फिर्णें विवरणें
सावधपणें सर्व जाणावें । वर्तमान आधींच घ्यावें ।
जाऊं ये तिकडे जावें ।
विवेकें सहित
नाना जिनसपाठांतरें ।
निवती सकळांचीं अंतरें ।
लेहोन देतां परोपकारें ।
सीमा सांडावी
जैसें जयास पाहिजे ।
तैसें तयास दीजे ।
तरी मग श्रेष्ठचि होइजे । सकळां मान्ये
भूमंडळीं सकळांस मान्य ।
तो म्हणों नये सामान्य ।
कित्येक लोक अनन्य । तया पुरुषासी
ऐसीं चातुर्याचीं लक्षणें ।
चातुर्यें दिग्विजये करणें ।
मग तयास काये उणें ।
जेथतेथें 15/06/25-30
याचा अर्थ असा आहे की, अनेक लोकांकडे काही ना काही घेण्यासारखा गुण असतो. विचारवंत लोकांशी मैत्री घडावी. आपण उगीचच हात जोडून स्वस्थ बसलो तर फिरणे किंवा विवरणे यापैकी काहीच घडणार नाही. सावधपणे सर्व गोष्टी जाणाव्यात. जेथे जायचे असेल तेथील वर्तमान स्थिती आधी जाणून घ्यावी आणि त्यानंतर योग्य वाटत असेल तरच तिकडे विचारपूर्वक जावे. अनेक प्रकारे उत्तम पाठांतर करून लोकांची अंत:करणे जाणून घ्यावीत. लोकांना ग्रंथ लिहून द्यावेत. ज्यांना जे पाहिजे असेल, ते त्याप्रमाणेच त्यांना द्यावे. त्यामुळे, सर्वांची मान्यता मिळवून माणूस श्रेष्ठ होतो. जो या जगात सर्वमान्य असतो, त्याला सामान्य समजू नये. अशा माणसाशी कित्येक लोक एकनिष्ठ होतात. चातुर्याची ही लक्षणे आहेत. अशाप्रकारे, चातुर्याने जो लोकांची मने जिंकतो, मग तो कुठेही गेला, तरी त्याला काहीही उणे पडत नाही. आपला देश अनेक वर्षे परकीय सत्तेशी संघर्षरत होता. परंतु, या कालावधीतही संतांनी भारतीय समाजाचे Samarth leadership सामर्थ्यशाली नेतृत्व केले. त्यामुळेच, भारतीय संस्कृती टिकून राहिली आहे. संतांनी केलेला उपदेश हा भारतीय समाजात रुजला आहे. आपला देश जगद्गुरू असण्याचे हे मूळ कारण आहे.