मतदान केंद्रांसाठी 166 इमारतींची पाहणी, केंद्र निश्चितीसाठी अधिकाऱ्यांना सूचना

---Advertisement---

 



जळगाव : महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यासाठी शहरातील 166 इमारतींची पाहणी करण्यात आली असून केंद्र अंतीम करण्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्याची माहिती मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 510 मतदान केंद्रांची आवश्यकता आहे. गरजेनुसार शहरातील 166 इमारतींची पाहणी करण्यात आली आहे. या पाहणीदरम्यान काही मतदान केंद्रांची दुरावस्था लक्षात घेता अतिरीक्त 100 केंद्र हे राखीव म्हणून निवडण्यात आले आहे.

मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा

या पाहणीदरम्यान मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा देखिल घेण्यात आला आहे. मतदानाच्यादृष्टीने आवश्यक ती सुरक्षितता, केंद्र कर्मचाऱ्यांसाठीच्या सुविधा याबाबतची माहिती घेण्यात आली आहे.

सुविधा नसलेली केंद्र रद्द करणार

शहरातील ज्या इमारतींची पाहणी करण्यात आली आहे, त्याठिकाणच्या केंद्रांमध्ये स्वच्छतागृह, पडाऊ खोल्या, गळणारे छत, पाणी, वीज अशा सुविधांचा अभाव असणारी मतदान केंद्र रद्द करून अतिरिक्त निवडण्यात आलेल्या केंद्र पर्यायी म्हणून उपयोगात आणले जाणार आहेत.

मतदार यादीवर वैयक्तीक हरकत आवश्यक

मतदार यादीसंदर्भात सामुहिक हरकती विचारात घेतल्या जाणार नाही. मतदाराने काही आक्षेप असल्यास वैयक्तीक हरकत नोंदवायची आहे. वैयक्तीक हरकतीत तथ्य असल्यास आवश्यक ते बदल करण्यात येतील. वैयक्तीक हरकतींवरच सुनावणी घेऊन निकाल दिला जाणार असल्याचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---