तरुण भारत लाईव्ह । १२ मार्च २०२३ । संध्याकाळी भूक लागल्यावर काय खावे असा प्रश्न पडतो. संध्याकाळच्या वेळेला काहीतरी हलके फुलके खायचे असते. अशावेळी चिवडा आपण खाऊ शकतो. मुरमुऱ्याचा चिवडा, पोह्याचा चिवडा, मक्याचा चिवडा या प्रकारचा चिवडा बाजारात उपलब्ध असतो. पण चिवडा घरी करायला सुद्धा खूप सोप्पं आहे. मक्याचा चिवडा घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
एक किलो मक्याचे पोहे 125 ग्रॅम शेंगदाणे दीडशे ग्रॅम खोबरे फोडणीचे साहित्य कडीलिंब मिरच्या एक किलो तेल मीठ आणि साखर
कृती
सर्वप्रथम मक्याचे पोहे व शेंगदाणे तळून घ्यावेत खोबऱ्याचे काप करावेत आणि तळावेत नंतर फोडणी करावी त्यात थोडी साखर मीठ घालून साहित्य घालून परतावे आणि तयार आहे मक्याचा चिवडा.