मोठी बातमी! ‘या’ क्षेत्रात गुंतवणुकीची संधी, जाणून घ्या सविस्तर

---Advertisement---

 

Business News : शेती, कृषी-तंत्रज्ञान आणि निर्यात क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. हाँगकाँग येथील गुंतवणूकदार ल्युमिनरी क्राउन लिमिटेडने वेगाने विस्तार करणाऱ्या ओरी ग्रो इंडिया लिमिटेड या भारतीय कंपनीत 24 टक्के भागेदारी खरेदी करण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. ल्युमिनरी क्राउनने 84 पैशांचा शेअर 2 रुपयांना खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे, म्हणजेच बाजारभावापेक्षा तब्बल दुप्पट दराने ही गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.

ल्युमिनरी क्राउन लिमिटेड ओरी ग्रो इंडियामध्ये 24 टक्क्यांपर्यंत इक्विटी स्टेक खरेदी करू इच्छिते. या गुंतवणुकीचा भाग म्हणून हाँगकाँगची कंपनी आपल्या एका संचालकाचे नाव बोर्डावर सुचवू शकते. मात्र, कंपनीच्या व्यवस्थापनावर कोणताही बदल होणार नाही. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आणि त्याचे मूल्यमापन करण्यासाठी ओरी ग्रो इंडियाच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी (26 डिसेंबर 2025) रोजी आयोजित करण्यात आली आहे.

ओरी ग्रो इंडियाने गेल्या एका वर्षात आर्थिक आघाडीवर जबरदस्त कामगिरी केली आहे. विक्रीत 10 पटीने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीची विक्री 16.76 कोटी रुपये होती, जी 2024-25 मध्ये वाढून 175.55 कोटी रुपये झाली आहे. तर कंपनीचा निव्वळ नफा 51 लाख रुपयांवरून थेट 7.17 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या नव्या भागीदारीतून तीन महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार कोणत्या क्षेत्रात याचा लाभ होईल जाणून घेऊया.

सेंद्रिय शेती : कंपनीच्या मालकीच्या जमिनीवर पुढील किमान पाच वर्षांसाठी सेंद्रिय शेती प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव आहे.

तांदूळ प्रक्रिया आणि निर्यात: भारत ही तांदूळ निर्यातीत मोठी शक्ती आहे. या भागीदारीद्वारे ओरी ग्रो आपला विस्तार गल्फ देश आणि युरोपीय बाजारपेठांमध्ये करणार आहे.

हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स फार्मिंग : मातीशिवाय केली जाणारी आधुनिक शेती विकसित करण्यासाठी 55 कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे. यातून वर्षाला 180 ते 200 कोटी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा असून, 13 टक्के नफा मिळण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---