---Advertisement---

गुंतवणूकदारांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड होल्डिंग आता ‘डिजीलॉकरमध्ये’, काय आहे ‘सेबी’चा प्रस्ताव ?

by team
---Advertisement---

SEBI Proposal: शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदाराच्या नावाने त्याच्या मृत्यूनंतर आर्थिक मालमत्ता हस्तांतरित करणे सुलभ करण्यासाठी, शेअर बाजार नियामक सेबी डिजीलॉकरचा वापर करण्याचा तयारी करत आहे. डिमॅट खात्यांमधील गुंतवणूकदारांची आर्थिक मालमत्ता, ज्यात म्युच्युअल फंडातील शेअर्स आणि युनिट्सचा समावेश आहे, सरकारी डिजिटल स्टोरेज सिस्टम डिजीलॉकरमध्ये सुरक्षितपणे संग्रहित केला जाईल.

सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ने केंद्र सरकारची डिजिटल स्टोरेज सिस्टम डिजीलॉकर वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे. यानुसार गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या नावावर विद्यमान आर्थिक मालमत्तेचे हस्तांतरण सुलभ करणे करणे हा आहे. गुंतवणुकदाराच्या नावावर जी काही आर्थिक मालमत्ता आहे ती त्याच्या नॉमिनी किंवा वारसाला सहज हस्तांतरित केली जाऊ शकते. गुंतवणूकदारांच्या आर्थिक मालमत्तेत शेअर्स, डिबेंचर असलेल्या डिमॅट खात्यांचे विवरण समाविष्ट असते. याशिवाय म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूकदारांच्या नावावर युनिट्सही असतात. गुंतवणूकदारांच्या या सर्व आर्थिक मालमत्तेतील गुंतवणुकीचे विवरण डिजीलॉकरमध्ये सुरक्षितपणे साठवले जाईल.

या प्रस्तावानुसार, गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर, डिजीलॉकर त्यांचे खाते अपडेट करेल आणि गुंतवणूकदाराने ज्यांना आपला नामनिर्देशित किंवा वारस बनवले आहे त्यांना सूचित करेल जेणेकरून ती व्यक्ती आर्थिक मालमत्ता व्यवस्थापित करू शकेल. अशाप्रकारे, मरण पावलेल्या गुंतवणूकदाराचे नॉमिनी त्याच्या आर्थिक मालमत्तेच्या तपशीलात प्रवेश करू शकतील आणि मालमत्ता हस्तांतरित करू शकतील.

३१ डिसेंबरपर्यंत सूचना देता येतील

डिपॉझिटरीज आणि म्युच्युअल फंडांनी डिमॅट आणि म्युच्युअल फंड होल्डिंग स्टेटमेंट डिजीलॉकरवर उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्ताव SEBI ने आपल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये मांडला आहे. KYC नोंदणी एजन्सीज (KRAs) गुंतवणूकदाराच्या मृत्यूची माहिती DigiLocker सोबत शेअर करतात असेही प्रस्तावित करण्यात आले आहे. डिजिलॉकर वापरकर्ते खाते ऍक्सेस करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला नामनिर्देशित करू शकतात. SEBI ने याबाबत 31 डिसेंबर 2024 पर्यंत लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment