IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने केलेली पोस्ट चर्चेत, नाव न घेता हार्दिक वर निशाणा, म्हणाला…

काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहे अश्यातच आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याची एक पोस्ट व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्याने 20 चेंडूत 24 धावांची खेळी केली. इरफान पठाणने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे – जर संघाचे सर्व फलंदाज 200 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत असतील तर कर्णधार 120 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करू शकत नाही. मात्र, माजी भारतीय अष्टपैलू खेळाडूने मुंबई इंडियन्स किंवा हार्दिक पंड्याचे नाव घेतलेले नाही.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने 20 चेंडूत केल्या 24 धावा.
मुंबई इंडियन्ससमोर 278 धावांचे लक्ष्य होते. सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी झंझावाती सुरुवात केली. यानंतर, तिलक वर्मा आणि टीम डेव्हिडसह उर्वरित फलंदाजांनी सुमारे 200 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, परंतु मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने 20 चेंडूत 24 धावा केल्यानंतरही खेळ सुरूच ठेवला. मात्र, इरफान पठाणचे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.