---Advertisement---

IPL 2024: राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ खेळाडूची संपूर्ण हंगामातून माघार

by team
---Advertisement---

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग चा नवा सीझन सुरू होण्यासाठी फारसा वेळ उरलेला नाही. आयपीएल 2024-22 मार्च म्हणजे आजपासून सुरू होणार आहे. आयपीएलच्या आगामी सीझनची सुरुवात चेन्नई आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमधील धमाकेदार सामन्यानं होणार आहे. IPL ला सुरवात होण्याअगोदरच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थान संघाचा खेडाळु असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ऍडम झाम्पाने संपूर्ण हंगामातून माघार घेतली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाने झाम्पाला 1.5 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात कायम ठेवले होते. ऑस्ट्रेलिया संघाचा पुढील स्पर्धा कार्यक्रम व्यस्त असल्यामुळे त्याने माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. झाम्पाच्या माघारीमुळे राजस्थानच्या फिरकी संघाची मदार आर. अश्विन आणि युझवेंद्र चहल यांच्यावरच असेल. राजस्थानने झाम्पाच्या जागेवर 25 वर्षीय तनुष कोटीयनला संघात स्थान दिले आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळणारा तनुष यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment