---Advertisement---

IPL 2024: CSK VS RCB सामन्याच्या एक दिवस आधी चेन्नई ला मोठा धक्का! हा स्टार खेडाळु आयपीएलमधून बाहेर होण्याची शक्यता

by team
---Advertisement---

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग चा नवा सीझन सुरू होण्यासाठी फारसा वेळ उरलेला नाही. आयपीएल 2024-22 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलच्या आगामी सीझनची सुरुवात चेन्नई आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमधील धमाकेदार सामन्यानं होणार आहे. अश्यातच चेन्नई संघासाठी निराशाजन बातमी समोर आली आहे.

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात त्याला हि दुखापत झाली होती. पाथिरानाची दुखापत हि चेन्नई संघासाठी मोठी धक्कादायक बातमी आहे. कारण आधीच न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे हा संघातून बाहेर गेला आहे. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे कॉनवे मेपर्यंत मैदानाबाहेर राहणार आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment