IPL 2024 : क्रिकेटप्रेमी उत्सुक असलेल्या आयपीएल 2024 च्या हंगामाला काही दिवसातच सुरवात होणार आहे. अश्यातच कोलकाता संघासाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर हा सुरुवातीच्या सामन्यात खेळण्याची श्यक्यता कमी आहे.
णजी चषकाच्या फायनल सामन्यावेळी श्रेयस अय्यरची पाठदुखीची समस्या उद्भवल्याने श्रेयस अय्यर सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या रणजी चषकाच्या फायनलमध्ये मुंबईने विदर्भाचा धुव्वा उडवला. या सामन्यातील दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरने शानदार खेळी केली होती. अय्यरने 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 95 धावांचा पाऊस पाडला. पण त्यानंतर त्याला पाठदुखीचा त्रास सुरु झाला. यामुळे श्रेयस अय्यर हा सुरुवातीच्या सामन्यात खेळण्याची श्यक्यता कमी आहे. अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसं झाल्यास हा कोलकात्यासाठी मोठा धक्का असेल.