IPL 2024 : LSG vs PBKS दोघांना कमबॅकची संधी, शिखर धवन की केल.एल. राहुल कोण बाजी मारणार

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 11 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स संघात खेळवला जाणार आहे. लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. के. एल. राहुल याच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जाएंटस आणि शिखर धवन याच्या नेतृत्त्वातील पंजाब किंग्ज विजयाच्या ट्रॅकवर परतण्याच्या निमित्तानं आमने सामने येतील. लखनौला पहिल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर, पंजाब किंग्जनं पहिल्या मॅचमध्ये दिल्लीला पराभूत केलं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये आरसीबी विरुद्ध त्यांना पराभवाला सामोरं जावं लागंल होतं. त्यामुळं आजच्या मॅचमध्ये दोन्ही संघांसाठी विजय महत्त्वाचा आहे.

लखनौला कोणत्या बाबी सुधाराव्या लागणार?
लखनौ सुपर जाएंटसला आजची मॅच जिंकायची असल्यास त्यांना फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. लखनौच्या मुख्य फलदाजांना पहिल्या मॅचमध्ये सूर गवसला नव्हता. राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी आणि मार्क्स स्टोइनिस यांना मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. आजच्या मॅचमध्ये निकोलस पूरन आणि के.एल. राहुल यांच्यासह पंजाबच्या इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल.

पंजाब विजयाच्या ट्रकवर परतणार?
शिखर धवनच्या पंजाब किंग्जनं आतापर्यंत दोन पैकी एका मॅचमध्ये पराभव स्वीकारला तर एका मॅचमध्ये विजय मिळवला आहे.पंजाबला त्यांच्या नेट रनटेमध्ये देखील सुधारणा करावी लागणार आहे. जॉनी बेयरस्टोनं चांगली फलंदाजी केली होती. शिखर धवनचं स्ट्राइक रेट कमी होतं. प्रभासिमरन सिंह आणि सॅम कुरन यांना देखील आजच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.