IPL 2025 : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज सोमवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. अव्वल दोन क्रमांकामध्ये स्थान मिळविण्याच्या लढतीत ते आपले सर्वस्व पणाला लावण्याचा निर्धार करतील. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या चार संघांनी आयपीएल प्ले ऑफमध्ये खूप आधी आपले स्थान निश्चित केले आहेत, त्यामुळे उर्वरित साखळी सामने अंतिम क्रमवारी निश्चित करतील.
१७ गुणांसह पंजाब किंग्ज सध्या आयपीएल गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, परंतु मुंबई इंडियन्सविरुद्धचा पराभव त्यांना तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर ढकलेल आणि ३० मे रोजी होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यासाठी त्यांची जागा निश्चित करेल. पंजाब किंग्जसाठी अव्वल दोन क्रमांकांमध्ये राहणे अधिक कठीण वाटते कारण त्यांना केवळ एका बलाढ्य मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध विजयाची आवश्यकता नाही, तर गुजरात टायटन्स (१८ गुण) आणि रॉयल चॅलेंजर्स (१७ गुण) त्यांचे संबंधित अंतिम सामने गमावतील अशी आशा देखील आहे.

अशाप्रकारे, दिल्ली कॅपिटल्सकडून गत सामना गमावलेले पंजाब किंग्ज अव्वल दोन क्रमांकामध्ये स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात मुंबईविरुद्ध विजय मिळवण्याच्या स्थितीत आहेत. मुंबई इंडियन्ससाठी चारही पात्रता संघांमध्ये त्यांचा उच्च नेट रन रेट फायदेशीर ठरू शकतो, जर त्यांनी पंजाब किंग्जला हरवले आणि गुजरात व बंगळुरूने आपले सामने गमावले. तरीही, शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २०० पेक्षा जास्त धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरत्यानंतर पंजाब किंग्ज आपल्या गोलंदाजीतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करतील.
या मैदानाच्या लहान चौकार व फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीमुळे उच्च धावसंख्येचा सामना होऊ शकतो, जो दोन्ही संघांच्या गोलंदाजी आक्रमणाची चाचणी घेईल, परंतु या आघाडीवर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सकडे आघाडी आहे. या आयपीएलमध्ये बुमराहने केवळ नऊ सामन्यांत १६ बळी घेतले आहेत, जे तीन महिन्यांच्या दुखापतीनंतर लय व तंदुरुस्तीमध्ये परतल्याचे संकेत देते, परंतु मुंबईच्या गोलंदाजी रांगेतील इतरांनीही समान भार वाटला आहे.
१९ बळींसह तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ट्रेंट बोल्ट व दीपक चहर (११) या नवीन चेंडू जोडीने बुमराहला सामन्याच्या नंतरच्या टप्प्यात ठेवण्यासाठी अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याने फिरकीपटू मिशेल सॅण्टनर व विल जॅक्स यांच्यासोबत चांगली कामगिरी केली आहे.
त्यामुळे पंजाब किंग्जच्या तुलनेत मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी विभाग अधिक घातक बनते. अर्शदीप सिंग (१६), युजवेंद्र चहल (१४), जो दुखापतीमुळे शेवटचा सामना खेळू शकला नव्हता आणि मार्को जॅन्सन (१४) यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध आव्हान असेल. सूर्यकुमार यादव (५८३ धावा) व श्रेयस अय्यर (४८८) हे आपल्या संबंधित फलंदाजी विभागाचे आधारस्तंभ आहेत आणि आयपीएलचा शेवट जवळ येत असताना त्यांच्या भूमिका अधिक महत्त्वाच्या आहेत.