---Advertisement---
IPL 2025 : भारत-पाकिस्तान तणावमुळे एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्यानंतर आपल्या मायदेशी परतलेले खेळाडू आता पुन्हा आयपीएलसाठी भारतात येऊ इच्छित नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या या निर्णयाला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला पाठिंबा दर्शविला आहे.
आयपीएलमधील विविध संघांतील ऑस्ट्रेलियन खेळाडू आधीच आपल्या घरी पोहचले आहे. केवळ रिकी पॉण्टिंग, ब्रेड हॅडिनसारखे काही माजी खेळाडू अजूनही भारतात मुक्कामास आहे. ते प्रशिक्षण चमूतील सदस्य आहे. अन्य प्रशिक्षक जस्टीन लँगर व माईक हसी हे सुद्धा मायदेशी परतले आहे.
शनिवारी युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर एका आठवड्यात आयपीएल पुन्हा सुरु करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. विविध फ्रँचायझींनी आपापल्या संघातील विदेशी खेळाडूंना भारतात परतण्यास सांगितले आहे. परंतु काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पुन्हा आयपीएल खेळण्यास नकार दिला आहे. द्विधा मनःस्थितीत सापडलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारतात परतण्यास नकार दिला आहे. खेळाडूंच्या या निर्णयाला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाठिंबा दिला आहे, असे दी सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तात म्हटले आहे.
ट्रॅव्हिस हेड, मिचेल स्टार्क, कर्णधार पॅट कमिन्स व सहकारी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड सारखे कसोटीपटू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम साम न्यासाठी इंग्लंकडे खाना होण्यापूर्वी काही वेळ घरी घालवू इच्छित आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर लगेच हा अंतिम सामना खेळला जाणार आहे