IPL Auction 2025: आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा लिलाव होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या लिलिवात ५७७ खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यातील जास्तीत जास्त २०४ खेळाडूंवरच बोली लागणार आहे.
आयपीएल इतिहासात ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. ऋषभ पंतसाठी लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपये मोजले आहेत. यासह तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
आयपीएल इतिहासातील महागड्या खेळाडूच्या यादीत दुसरं नाव श्रेयस अय्यरचं आहे. मागच्या हंगामात श्रेयसच्या नेतृत्वात कोलकात्याने जेतेपद जिंकलं होतं. एका जबरदस्त कर्णधाराची गरज पंजाब किंग्सला होतील. अखेर त्याच्यासाठी पंजाब किंग्सने 26.75 कोटी मोजले आणि त्याला आपल्या संघात घेतलं.
आयपीएलमधील महागड्या खेळाडूच्या यादीत चौथं नाव येतं ते पॅट कमिन्सचं.. 2023 मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी 20.50 कोटी मोजले होते. त्याची खेळी आणि कर्णधारपदाची भूमिका पाहून त्याला फ्रेंचायझीने रिटेन केलं आहे.
मागच्या पर्वात सर्वात महागडा खेळाडू म्हणून मिचेल स्टार्कची चर्चा रंगली होती. कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी खर्च करून त्याला संघात घेतलं होतं. पण रिलीज केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 11.75 कोटी खर्च करून संघात घेतलं.