इराण-इस्रायलचे परस्परांवर हल्ले, बुशेहर अणुकेंद्राजवळ क्षेपणास्त्रांचा मारा, रशियाकडून निषेध

---Advertisement---

 

तेहरान : इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ इस्रायलने गुरुवारी क्षेपणास्त्रांचा मारा केला. अणुप्रकल्पाला लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना आहे. रशियाने या हल्ल्याचा निषेध करीत इस्रायलला इशारा दिला. दुसरीकडे इराणने सौदी अरब, युएई, कुवैत आणि इस्रायलच्या अनेक शहरांवर ड्रोनचा मारा केला तर इस्रायलचे तेहरान, लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या अड्ड्यांवर हल्ले सुरूच आहेत.

इस्रायलने गुरुवारी पहाटे इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ केलेल्या हल्ल्याचा निषेध करताना रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, अमेरिका आणि इस्रायल जाणूनबुजून अणू आपत्ती घडवण्याचा प्रयत्न करीत आहे. बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पात रशियाचे ३०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहे. हल्ल्यात त्यांचे नुकसान झाल्यास शांत बसणार नाही. इराण आणि रशियाने संयुक्तपणे बांधलेल्या या ठिकाणाहून कामगारांना बाहेर काढण्यास आम्हाला भाग पाडले जात आहे.

अणुप्रकल्पांवर हल्ले करणे टाळणे जागतिक शांततेसाठी गरजेचे आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या शिराझ प्रदेशातील काफरी गावातील निवासी भागावर हल्ले केले. दोन मुलांसह १० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणच्या सरकारी प्रवक्त्याने केला आहे. इराणने हल्ल्याला प्रत्युत्तर देत आखाती देशांवर ड्रोनचा मारा केला. अबुधाबीमध्ये क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आले. क्षेपणास्त्राच्या अवशेषांमुळे दोन जण ठार झाले.

संयुक्त राष्ट्रांकडून शांततेचे आवाहन

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटारेस यांनी शांततेचे आवाहन करताना म्हटले की, पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा सर्वात वाईट परिणाम गरीब आणि असुरक्षित लोकांवर होत आहे. या संघर्षाचे मानवी परिणाम अशा नागरिकांना भोगावे लागत आहेत ज्यांची या संघर्षात कोणतीही भूमिका नाही. युद्ध थांबवून दोन्ही पक्षाने तत्काळ चर्चेने मार्ग काढावा.

आम्ही प्रत्येक सीमा तोडू

८ दहशतवादी दहशतवादी संघटना इस्रायलच्या अनेक भागांवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर इसायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी लेबनॉनच्या सीमेवर सैन्याची तैनाती वाढविण्याचे आदेश दिले. लेबनॉनची प्रत्येक सीमा तोडून आमचे लष्कर आत घुसून कारवाई करेल. हिजबुल्लाहच्या सदस्यांना शोधून ठार केले जाईल.

कुवैत विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

कुवैत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका इंधन टाकीमध्ये ड्रोन हल्ल्यानंतर भीषण आग भडकली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका शत्रूच्या ड्रोनने केलेल्या हल्ल्यामुळे ही आग लागली असून, ती विझवण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे. संघर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कुवेतमध्ये अशा ८२ घटनांची नोंद झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---