IRFCच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायचा विचार करताय ? तर….

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरएफसी 2021 मध्ये लिस्टिंग झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षांत स्टॉकमध्ये फारशी हालचाल दिसली नाही. पण त्यानंतर 2023 मध्ये आयआरएफसीचे शेअर्स 200 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. शेअरने 26 रुपयांच्या इश्यू किंमतीवर सूट देऊन शेअर बाजारात एन्ट्री केली. पण आता हा शेअर त्याच्या आयपीओ किंमतीच्या 6 पट जास्त म्हणजेच 176.39 रुपयांवर पोहोचला आहे. जानेवारी महिन्यात या शेअरमध्ये 75 टक्के वाढ झाली, जी एका महिन्यातील स्टॉकसाठी आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. याआधी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा शेअर 53 टक्क्यांनी वाढला होता.

गेल्या 9 दिवसांमध्ये या शेअरमध्ये 76 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. या वाढीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपने 2.30 लाख कोटींची पातळी ओलांडली आहे. यासह, आयआरएफसी हा सर्वाधिक मार्केट कॅप असलेला रेल्वे स्टॉक बनला आहे.सरकारकडे कंपनीमध्ये अजूनही 86.36 टक्के हिस्सेदारी आहे, बाजारात फक्त 13.5 टक्के फ्री फ्लोट आहे. फ्री फ्लोटची उपलब्धता नसणे म्हणजे शेअरच्या किंमतीत तीव्र चढ-उतार दिसून येतील. सध्याच्या बाजारभावांच्या आधारे, आयआरएफसी मधील सरकारची हिस्सेदारी 1.8 लाख कोटी इतकी आहे. चांगल्या ऑर्डर बुकमुळे त्यांना पुढील 4-5 वर्षांमध्ये महसूल मिळेल,”असे मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टीप: शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे  असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे ,शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.