Islamic Nato: दहशतवाद आणि इतर आव्हानांचा सामना करण्यासाठी 25 हून अधिक मुस्लिम देश नाटोच्या धर्तीवर संघटना स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. त्याचे नाव इस्लामिक नाटो असू शकते. ते नाटोप्रमाणेच दहशतवादविरोधी कारवाया करेल. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन अर्थात नोटो ही संघटना सर्वपरिचित आहे. ही संघटना म्हणजे वेगवेगळ्या देशांची लष्करी तसेच राजकीय युती असल्याचं म्हटलं जातं. या संघटनेत युरोपीय तसेच उत्तर अमेरिकन देशांचा समावेश आहे. याच संघटनेच्या धर्तीवर मुस्लीम राष्ट्रे नवी संघटना स्थापन करण्याच्या विचारात आहेत. संघटनेत पाकिस्तान देशदेखील सामील होणार आहे.
दहशतवाद तसेच अन्य संकटांना तोंड देण्यासाठी जगभरातील अनेक मुस्लीम राष्ट्रे एकत्र येण्याचा विचार करत आहेत. या समूहाच्या सदस्य देशांच्या संख्येबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी एका अंदाजानुसार आशिया आणि आफ्रिकेतील २५ देशांचा त्यात समावेश होऊ शकतो.
कोणकोणते मुस्लिम राष्ट्र सहभागी होऊ शकता ?
या प्रस्तावित समूहात सौदी अरेबिया, पाकिस्तान, टर्की, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, बांगलादेश, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, इराण, इराक, ओमान, कतार, कुवेत, मोरक्को, अल्जीरिया, ट्यूनीशिया आणि लीबिया आदी देश इस्लामिक नाटो या संघटनेचे सहयोगी बनू शकतात. सोबतच अझरबैजान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ब्रुनेई हे देशही या संघटनेत सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संघटनेच्या निर्मितीचा उद्देश काय?
मिळालेल्या माहितीनुसार नाटो या संघटनेसारखेच मुस्लीम राष्ट्राचे संघटन निर्माण करण्यामागे काही उद्देश आहे. दहशतवादाला थांबवण्यासाठी ही प्रस्तावित संघटना काम करणार आहे. सोबतच या संघटनेतील सदस्य राष्ट्र लष्करी बळ वाढवण्यास एकमेकांना मदत करणार आहेत. सदस्य राष्ट्रांमधील अंतर्गत स्थिरता तसेच बाह्य संकटांशी लढण्यासही हे देश एकमेकांना मदत करणार आहेत.
भारतावर याचा काय परिणाम होणार ?
नाटो या संघटनेप्रमाणेच इस्लामिक नाटो ही संघटना उदयास आली तर त्याचा भारतावर अप्रत्यक्षपणे परिणाम पडू शकतो. पाकिस्तान हा एक मुस्लीमबहुल देश आहे. त्यामुळे हा देश इस्लामि नाटो संघटनेचा सदस्य होऊ शकतो. दुसरीकडे भारताचे पाकिस्तानसोबत फारसे चांगले संबंध राहिलेले नाहीत. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताचे पाकिस्तानसोबत युद्धही झालेले आहे. त्यामुळे इस्लामिक नाटो या प्रस्तावित संघटनेत पाकिस्तान जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करू शकतो. परिणामी इस्लामिक नाटो संघटनेतील देश भारतावर दबाव टाकू शकतात. त्यामुळे भारतासाठी हे अडचणीचं ठरू शकतं.