इसायल – इराण युद्धामुळे भारताच्या तेल धोरणात बदल, रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली

नवी दिल्ली : इसायल आणि इराणचे युद्ध सुरू असून त्यात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. या दरम्यान भारताने तेल खरेदीसंदर्भातील आपल्या धोरणात बदल केला असून रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने भारताने जूनमध्ये काही निर्णायक पावले उचलली.

भारताची जूनमधील रशियाकडून केलेली तेल खरेदी पश्चिम आशियातील पुरवठादारांपेक्षा कितीतरी जास्त होती. पश्चिम आशियात सौदी अरब आणि इराक हे दोन मोठे तेल पुरवठादार आहेत. भारताच्या तेल कंपन्यांनी जूनमध्ये रशियाकडून दरदिवशी २० ते २२ लाख बॅरल इतके कच्चे तेल खरेदी केले आहे.

हा आकडा सौदी अरब, इराक, संयुक्त अरब अमिरात आणि कुवैत यांच्याकडून घेतलेलेया तेलाच्या एकूण प्रमाणापेक्षाही जास्त आहे. मे महिन्यात रशियाकडून भारताची तेल आयात दररोज १९.६ लाख बॅरल इतकी होती. जूनमध्ये अमेरिकेतूनही आपात वाढली आहे. रशियाचे तेल इतर देशांच्या तुलनेत स्वस्त असल्याने भारत त्यांच्याकडूनच खरेदी करतो.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ते आयातदार आणि ग्राहक देश आहे. विविध देशांकडून भारत जवळपास ५१ लाख बॅरल इतके कच्चे तेल खरेदी करतो. याला रिफायनरीत पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनात परिवर्तीत केले जाते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment