---Advertisement---
इस्रायली नौदलाने रविवारी पहाटे येमेनमधील हुथीच्या नियंत्रणात असलेल्या भागात जोरदार हल्ले केले. यात हुथींचे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, तर वीज प्रकल्पाचे केंद्र पूर्णतः जमीनदोस्त झाले. या हल्ल्यात हुथींचे शंभरपेक्षा अधिक सदस्य ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला, मात्र हुींकडून मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली नाही.
इस्रायलच्या लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, राजधानी सनाच्या दक्षिणेकडील भागाला लक्ष्य करीत इस्रायली नौदलाने हुथींच्या अड्डयांवर क्षेपणास्त्राने हल्ले केले. यात या भागातील वीजपुरवठा करणारे हाजिफ पॉवर स्टेशन जमीनदोस्त झाले. याशिवाय या भागातील अनेक इमारतींना आग लागली.
हल्ल्यात वीज प्रकल्पातील कामगारांसह हुथीचे शंभरपेक्षा अधिक सदस्य ठार झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान इस्रायली नौदलाने येमेनवर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. जूनच्या सुरुवातीला हुर्थीच्या नियंत्रणाखालील होदेइदा बंदराला लक्ष्य करण्यात आले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून हुथी इस्रायलवर हल्ला करत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल देखील हुींवर हल्ले करीत आहे.