---Advertisement---
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध थांबले असले तरी भारत आता पाकिस्तानवर आकाशातून लक्ष ठेवून आहे. भारताचे दहा उपग्रह सध्या पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती इसोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी एका कार्यक्रमातून दिली आहे.
भारताच्या सीमा भागातील प्रत्येक नागरिक सुरक्षित असल्याची खात्री इस्रोच्या अध्यक्षांनी दिली आहे. केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या एका कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत किमान १०० दहशतवादी आणि पाकिस्तानचे ३५-४० सैनिक मारले गेले. भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर २४ तासांनी तिन्ही सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन चार दिवस चाललेल्या माहितमेची माहिती दिली. त्यानंतर आता पाकिस्तानकडून होणारे हल्ले थांबले असले तरी भारताकडून पाकिस्तानवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
इसोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले, देशातील नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या धोरणात्मक उद्देशाने किमान १० उपग्रह सतत चोवीस तास कार्यरत आहेत. तुम्हाला सर्वांना आपल्या शेजान्यांबद्दल माहिती आहे. जर आपल्याला देशाची सुरक्षा सुनिश्चित करायची असेल तर आपल्या उपग्रहांद्वारे सेवा द्यावी लागेल. आपल्याला आपल्या ७००० किमी समुद्रकिनाऱ्यावरील भागांचे निरीक्षण करावे लागेल. संपूर्ण उत्तर भागाचे सतत निरीक्षण करावे लागेल. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण ते साध्य करू शकत नाही.