बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुन्हा एकदा इतिहास स्वण्याच्या तयारीत आहे. सूर्याची रहस्ये उलगडण्यासाठी प्रक्षेपित करण्यात येणारी मोहीम प्रोबा-३ साठी इस्रो सज्ज आहे. या संदर्भातील माहिती इसोने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरून दिली आहे.
सूर्याचे रहस्य उलगडण्यात अनेक देश गुंतले आहेत. इसोदेखील या शर्यतीत पीएसएलव्ही-एक्सएल प्रोबा-३ प्रक्षेपित करून महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. बुधवारी पीएसएलव्ही-एक्सएलमधून प्रोबा-३ या मोहिमेचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेत अनेक देशांतील शास्त्रज्ञ सामील आहेत आणि त्यांचे ध्येय साध्य करण्याची संपूर्ण जबाबदारी इस्रोच्या सर्वांत विश्वासार्ह ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनावर म्हणजेच पीएसएलव्हीवर आहे.
इसोने या मोहिमेविषयी म्हटले की, युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ईएसए) प्रोबा-३ मिशनचे प्रक्षेपण बुधवारी सायंकाळी ४:०८ वाजता आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रावरून केले जाईल. प्रोबा-३ ची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लि. च्या (एनएसआयएल) सहकार्याने ही मोहीम प्रक्षेपित होणार आहे. यासोबतच इसोने समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, या मोहिमेद्वारे ५५० किलो वजनाचे उपग्रह एका अद्वितीय उच्च लंबवर्तुळाकार कक्षेत ठेवले जातील. जे जटिल कक्षेत अचूक प्रक्षेपण करण्यासाठी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्ही- एक्सएलची विश्वासार्हता मजबूत करेल. या मोहिमेअंतर्गत, युरोपियन एजन्सीला सूर्याच्या वातावरणातील सर्वांत बाहेरील आणि सर्वांत उष्ण थर असलेल्या सौर कोरोनाचा अभ्यास करायचा आहे.
कृत्रिम सूर्यग्रहणाचा प्रयोग
प्रोबा-३ मिशनमध्ये प्रक्षेपित करण्यात आलेले उपग्रह कृत्रिम सूर्यग्रहणासाठी परिस्थिती निर्माण करतील जेणेकरून सूर्याच्या बाह्य थराचा म्हणजेच कोरोनाचा अभ्यास करता येईल. या दुहेरी उपग्रहांपैकी एका उपग्रहामध्ये कोरोनग्राफ असेल तर दुसऱ्या उपग्रहामध्ये बदल असेल. यापैकी एक उपग्रह सूर्य लपवेल, तर दुसऱ्याच्या मदतीने कोरोनाचे निरीक्षण केले जाईल, असेही इसोने म्हटले आहे.
प्रोबा-३ ची वैशिष्ट्ये
प्रोबा-३ हे मिशन इस्रो आणि युरोपियन अंतराळ संस्था यांच्यातील महत्त्वपूर्ण सहकार्य चिन्हांकित करते. ज्याचा उद्देश सौर वातावरणाचा बाहय स्तर म्हणजे कोरोनाचा अभ्यास करणे. हा सौर गतिशीलता आणि अवकाशातील हवामान घटना समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हा उपग्रह अवकाशात अत्यंत लंबवर्तुळाकार कक्षेत अंदाजे १५० मीटरने वेगळा होईल. ज्याठिकाणी उपग्रह सूर्यप्रकाश रोखू शकेल. प्रक्षेपित झाल्यानंतर सेटअप सहा तासांनंतर सतत निरीक्षणे नोंदवण्यात येतील, असे इसोने म्हटले आहे.