इस्रो करणार आदित्य-एल १ मोहिमेचा अभ्यास, भारतीय संशोधकांकडून मागवले प्रस्ताव

---Advertisement---

 

नवी दिल्ली : सूर्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय अंतराळ मोहीम असलेल्या आदित्य-एल१ मधील महिती मिळवण्यासाठी भारतीय सौर भौतिकशास्त्रज्ञांकडून प्रस्ताव मागवले जात आहेत, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी जाहीर केले.
भारतीय शास्त्रज्ञांना आदित्य-एल १ मोहिमेची माहिती मिळवण्यासाठी इस्रोने केलेले हे दुसरे औपचारिक आवाहन आहे. पहिले आवाहन जानेवारीमध्ये करण्यात आले होते.

सध्या, २७टीबी पेक्षा जास्त माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे आणि अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक निष्कर्ष आंतरराष्ट्रीय पीअर-रिव्ह्यूड नियतकालिकेमध्ये प्रकाशित झाले आहेत. या अद्वितीय मोहिमेतून मिळणारा वैज्ञानिक लाभ आणखी वाढवण्यासाठी, इस्रोने आदित्य-एल १ निरीक्षणासाठी भारतीय सौर प्रस्ताव भौतिकशास्त्रज्ञांकडून मागवणारी दुसरी ‘अनाउन्समेंट ऑफ अपॉर्चुनिटी’ प्रसिद्ध केली आहे, असे इस्रोने एका निवेदनात म्हटले आहे.

भारतातील संस्था, विद्यापीठे किंवा महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेले भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक प्रस्ताव सादर करू शकतात.
अर्जदार सौर विज्ञान क्षेत्रातील संशोधनात गुंतलेले असावेत आणि आवश्यक वैज्ञानिक व तांत्रिक समर्थनासह सौर निरीक्षणासाठी मुख्य अन्वेषक म्हणून प्रस्ताव सादर करण्यास सक्षम असावेत. या दुसऱ्या ‘अनाउन्समेंट ऑफ अपॉर्चुनिटी’ चक्रासाठी मंजूर निरीक्षणे जुलै ते सप्टेंबर दरम्यान होतील. सप्टेंबर २०२३ मध्ये प्रक्षेपित झालेली आदित्य-एल १ मोहीम, जानेवारी २०२४ मध्ये सूर्य-पृथ्वी प्रणालीतील पहिल्या लॅग्रेजियन बिंदू (एल१) भोवतीच्या हॅलो कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली.

सात पेलोड्सचा समावेश

आदित्य-एल १ मोहिमेत सात वैज्ञानिक पेलोड्स आहेत. चार रिमोट सेन्सिंगसाठी आणि तीन प्रत्यक्ष जागेवरील मोजमापांसाठी आहेत. रिमोट सेन्सिंग उपकरणे विद्युत चुंबकीय प्रारणाच्या विविध तरंगलांबी वापरून सूर्याच्या विविध थरांचे आहे. यात कोरोना यांचा समावेश आहे. ते निरीक्षण करतात, असे इसोने म्हटले आहे. फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---