India vs Australia 1st Test: पर्थ स्टेडियममध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाची सुरुवातही भारतासाठी चांगली झाली. यशस्वीने सामन्यातील तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात केएल राहुलसोबत द्विशतकी सलामी भागीदारीसह वैयक्तिक शतक झळकावलं आहे. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीतील हे चौथं शतक ठरलं. यशस्वीने या शतकासह खास आणि मानाच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
पहिले सत्र संपल्यानंतर टीम इंडियाची धावसंख्या 84 षटकांत 275/1 अशी आहे. केएल राहुलच्या रूपाने टीम इंडियाने या सत्रात केवळ 1 विकेट गमावली. सध्या संघाच्या हातात 9 विकेट्स आहेत. भारताने 321 धावांची आघाडी घेतली आहे. यशस्वी जैस्वाल 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 141 धावा करून खेळत आहे तर देवदत्त पडिक्कल 2 चौकारांच्या मदतीने 25 धावा करत खेळत आहे.
ऑस्ट्रेलियातील युवा भारतीय शतकवीर
सचिन तेंडुलकर – 1992, वय – 18 वर्ष 253 दिवस
ऋषभ पंत – 2019, वय 21 वर्ष 91 दिवस
दत्त फडकर – 1948, वय 22 वर्ष 42 दिवस
यशस्वी जयस्वाल – 2024, वय 22 वर्ष 330 दिवस
What a way to bring up the ton! #AUSvIND | #MilestoneMoment | @nrmainsurance pic.twitter.com/okMDAno5tE
— cricket.com.au (@cricketcomau) November 24, 2024