Jal Jeevan Yojana : जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून केंद्र व राज्य शासनांतर्गत जलजीवन योजनेंतर्गत काम केले जात आहे. मात्र, जलजीवन योजनेच्या कामांचा वेग अतिशय संथ असून आतापर्यंत जिल्ह्यातील ३०० हून अधिक योजनांचे काम पूर्ण झाले आहे. बरीचशी कामे अपूर्णावस्थेत आहेत. मार्चअखेर शासनाकडून २१ कोटींचा निधी जिल्हा परिषद प्रशासनाला मिळाला आहे. या निधीतून ठेकेदारांच्या थकीत देयकांच्या रकमा दिल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग अभियंता यांनी दिली.
गेल्या महिन्याभराच्या कालावधीत जिल्हा परिषद प्रशासनाला शासन स्तरावरून जलजीवन योजनेसाठी १० कोटींचा निधी वितरित करण्यात आला होता. त्यापैकी काही रकमेतून ठेकेदारांच्या देयकांची देणी तसेच काही रक्कम टंचाईग्रस्त भागातील योजनांसह मार्चअखेर १०० टक्के काम पूर्ण करण्यात येईल, अशा योजनांवर खर्च करण्यात आला होता. यात ८० कोटी रुपयांची ठेकेदारांची देयके जिल्हा परिषद प्रशासनाकडे थकीत आहेत. त्यात नव्याने मिळालेल्या निधीतून रखडलेली काही देयके अदा करता येणार आहेत.
आंदोलनामुळे योजनांवर परिणाम गत आर्थिक वर्षात देयके थकीत झाल्यामुळे मार्च दरम्यान ठेकेदारांनी काम बंद आंदोलन केले होते. याचा परिणाम जलजीवन योजनांवर झाला असल्याचे दिसून आले आहे.
मागील निधी एप्रिल दरम्यान खर्च करणे अपेक्षित
जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झालेला २१ कोटींचा निधी, २ एप्रिलपर्यंत खर्च करण्याच्या स्पष्ट सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्वरित या निधीतून बिलांचे वाटप करण्यावर भर देण्यात आला आहे. दरम्यान, जलजीवन मिशन योजना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविली जात असून गेल्या काही महिन्यांपासून केंद्र शासनाकडून या योजनेसाठी निधी प्राप्त झालेला नाही. तसेच राज्य शासन स्तरावरूनही टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जात आहे
जलजीवन योजनेचे काम पूर्ण होऊनही बऱ्याच ठेकेदारांची • ८० कोटींहून अधिकची देयके थकली होती. राज्य शासन स्तरावरून २१ कोटींचा निधी जळगाव जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. या निधीतून ठेकदारांची थकलेली बिले, देणी दिली जाणार आहेत.
-जी. एस. भोगवडे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जि.प. जळगाव
Jal Jeevan Yojana : जलजीवन योजनेच्या कामांचा वेग मंद; मार्चअखेर २१ कोटींचा निधी वितरित
by team
Published On: एप्रिल 13, 2025 10:50 am

---Advertisement---