जळगाव : शेती तसेच घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत म्हणून छळ करणाऱ्या पतीसह चार आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. विद्यानगर येथील माहेर असलेल्या कविता हेमंत सोळुंके या विवाहितेला सासरच्या लोकांकडून त्रास दिला जात होता. कविता हेमंत सोळुंके हीच विवाह चोपडा तालुक्यातील देवगाव येथील हेमंत सोळुंके यांच्याशी झाला.
त्यानंतर तिने माहेरून घराचे कर्ज फेडण्यासाठी व शेतीचे घेण्यासाठी १० लाख रुपये आणावेत यासाठी तिचा छळ केला जात होता. याच कारणावरून तिला वेळोवेळी शिवीगाळ करीत मारहाण केली व तिचा शारीरिक तसेच मानसिक छळ केला गेला.या छळाला कंटाळून कविता ३१ ऑगस्ट रोजी माहेरून निघून आल्या ३१ ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजता पती हेमंत साळुंके, सासू छाया प्रमोद साळुंके, सासरे प्रमोद विठ्ठल साळुंके,, नणंद पल्लवी प्रमोद, या चार जणांविरुद्ध रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.