Crime News : जळगाव शहारत चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. भर दिवसा घरावर दरोडा टाकून मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना अनेक घडल्या आहेत. मात्र आता चक्क स्टेट बँकेच्या मॅनेजरवर कोयत्याने हल्ला चढवत सुमारे 17 लाखांची रोकडसह लाखोंचे सोने लुटले. ही धक्कादायक घटना शहरातील स्टेट बँकेच्या कालिका मंदिर भागात गुरुवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून चोरटे आल्याचा संशय असून जिल्हाभरात चोरट्यांना पकडण्यासाठी यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे.
जळगावच्या कालिका माता मंदिर परीसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता बँक उघडताच नियमित कामात कर्मचारी गुंग असतानाच गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून बँकेत आले. कोयत्यासारखे धारदार शस्त्राने त्यांनी कर्मचार्यांना धमकावत आधी बँक व्यवस्थापकावर हल्ला चढवल्याने व्यवस्थापकांच्या मांडीला मोठी जखम झाली तर काही कळण्याआत दरोडेखोरांनी बँकेतील 12 ते 15 लाखांची रोकड बॅगेत भरून काही क्षणात पळ काढला.
पाळत ठेवून दरोडा टाकल्याचा संशय
गुरुवारी सकाळच्या वेळी फारशी ग्राहकांची वर्दळ नसल्याने चोरट्यांनी पाळत ठेवून दरोडा फत्ते केला. दरोड्याची माहिती कळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीचीचे प्रभारी शंकर शेळके आदींनी सहकार्यांनी भेट देत माहिती जाणली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. बँकेवरच दरोडा पडल्याने नागरीकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.