Jalgaon : येथील सी. ए. विद्यार्थी शाखेच्या अध्यक्ष्ापदी सी.ए. हितेश आगीवाल यांची निवड करण्यात आली आहे. गुरूवार 7 मार्च रोजी झालेल्या पद हस्तांरण सोहळ्यात त्यांनी पदाची सूत्रे स्विकारली.
सी. ए. विद्यार्थी शाखेचे माजी अध्यक्ष सी. ए. अभिषेक कोठारी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल यांच्याकडे सी.ए. विद्यार्थी शाखेचा पदभार सोपविला.
प्रमुख पाहुणे म्हणुन माजी जि. प. सदस्य प्रताप पाटील, पश्चिम विभागीय सी.ए. विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष सी.ए. पियुष चांडक उपस्थित होते. 2024-25 च्या नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल, उपाध्यक्ष ऋतुजा महाजन, सचिव कुणाल वालभानी, सहसचिव आदिश चांदीवाल, कोषाध्यक्ष वंशिता सोनवणे, सहकोषाध्यक्ष साक्षी पाटील, प्रथमेश मानुधने, आयुष अग्रवाल, प्रतीक्षा येवले यांची कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात प्रताप पाटील यांनी सी.ए चा अभ्यासक्रम हा खूप कठीण असून आज राज्याला तसेच जिल्ह्याला सी.ए. ची गरज आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे युवकांसाठी तसेच नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न नमूद केले व नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने व जिद्दीने परत उभे राहून यश संपादन करावे असे सांगीतले. सी.ए. पियुष चांडक यांनी पश्चिम विभागीय विद्यार्थी शाखेच्या नियोजित वर्षभरातील उपक्रमांबद्दलची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना करून देऊन नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्यात. सूत्र संचालन हिताक्षी तिवारी व आभार कुणाल वालभानी यांनी मानले.
सनदी लेखापाल हेच राष्ट्र निर्माणातील भागीदार
नवनिर्वाचित अध्यक्ष सीए. आगीवाल यांनी सुरू होणाऱ्या कार्यकाळासाठी “सक्षम – स्वतंत्रता, क्षमता व मैत्री से मंजिल की और…“ ही संकल्पना प्रस्तुत करून भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर बनवण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी सनदी लेखापाल हेच खरे राष्ट्र निर्माणातील भागीदार ठरतील असे प्रतिपादन केले. नवीन वर्षामध्ये होणाऱ्या सी.ए. विद्यार्थी शाखेच्या विविध कार्यक्रमासाठी त्यांचे नियोजन मांडत सर्व सी.ए. सभासद, कार्यकारिणी सदस्य, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जळगाव सी.ए.शाखेला उज्ज्वल यश मिळवून देऊ अशी अपेक्षा व्यक्त केली.