Jalgaon : पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केटी बागली

jalgaon  : येथील पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या वतीने  25 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पर्यावरण आणि बाल साहित्यिका केटी बागली यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सहकार्य लाभले आहे.

 

पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या वतीने हे तिसरे पर्यावरण साहित्य संमेलन योजनेत येत आहे, यापूर्वी प्रसिद्ध मराठी लेखिका विना गव्हाणकर आणि वन्यजीव क्षेत्रातील तज्ञ किशोरी ते यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान भूषविले आहे.

 

केटी बागली यांनी निसर्ग संवर्धनावर विपुल लेखन केले असून विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले काम आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाण्यात आलेले आहे, केटी बागली ह्या सूक्ष्मजीव शास्त्राच्या अभ्यासात असून त्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक संपादन केलेला आहे.   निसर्ग संवर्धनावर आधारित 35 पेक्षा अधिक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.  यामध्ये प्रामुख्याने राणी बाग 150 इन्सेक्ट वर्ल्ड, गॉडस् ग्रीन ग्रिपिंग टेल, स्टोरीज ट्रिज फॉर्म इंडिया फ्लाईट, ऑफ द पिंक हेडेड डक, कपेला बॉय, अन्न हे पूर्णब्रह्म (मेघा राजाध्यक्ष आणि के टी बागली इंग्रजी पुस्तकावर आधारित), ऑन द वर्ल्ड साईड, गर्ल्स अँड हीजस्, हाऊ ब्लू इज वर प्लॅनेट यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्या यंग वर्ल्ड आणि द हिंदू या शालेय मुलांसाठी समर्पित असलेल्या आणि इतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मासिकांसाठी सातत्याने स्तंभ लेखन करतात. यांची पुस्तके आणि साहित्य संपदा शालेय पुस्तकांसाठी आणि प्राणी शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ साहित्य म्हणून शिफारस करण्यात आलेली आहे.

 

एक निसर्गप्रेमी म्हणून, केटी बागली यांची पुस्तके अनेकदा प्राणी, वन्यजीवन आणि भारतीय लँडस्केप यांना समर्पित आहेत. त्यांची ऑन द वाइल्ड साईड आणि द जू अराउंड यू ही पुस्तके लहान मुलांमध्ये आणि पालकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत , या पुस्तकांच्या साहित्य संपादेतून लहान मुलांशी कवितांद्वारे पक्षी आणि प्राण्यांशी संवाद साधला जातो.

 

‘हाऊ टू राइट अ शॉर्ट स्टोरी स्टेप-बाय-स्टेप’ या विषयावर त्यांचे स्तंभ लेखन विद्यार्थी आणि पालकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. पर्यावरण साहित्य संमेलनामध्ये श्रीमती केटी बागली यांची प्रकट मुलाखत योजण्यात आली असून, त्या थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

 

पर्यावरण साहित्य संमेलनामध्ये पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनावर आधारित कथाकथन आणि कवी संमेलनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला आहे. या विषयी निवड फेरी येत्या 13 फेब्रुवारी 2024 रोजी पर्यावरण शाळा, कोल्हे नगर येथील संपन्न होईल. अधिक माहितीसाठी चेतना नन्नवरे (9225124311)अर्चना उजगरे ( 8830768120) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.