Jalgaon : भारताला विश्वगुरू होण्यासाठी समाज एका प्रवाहात असावा : बालकृष्ण खानवेलकर

Jalgaon : भारताला विश्वगुरू होण्यासाठी सर्व समाज एका प्रवाहात असायला हवा. रा.स्व.संघाचे व्दितीय सरसंघचालक गुरूजींनीही सर्व समाजाला जागृत करून एकत्र आण्ाण्याचे काम केले. भेदभाव दूर करत हिंदूत्वाचा प्रचार केला. त्याचा परिणाम म्हणजे अयोध्येत राम लल्लाच्या मंदिराच्या रूपात दिसत आहे. असे मत जनकल्याण समिती, देवगिरी प्रांताचे संभाग कार्यवाह बलाकृष्ण प्रल्हाद खानवेलकर यांनी केले.

रा.स्व.संघ सेवा भारतीच्या सेवालयाच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्ताने 8 मार्च रोजी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्ष्ास्थानी जनरल सर्जन डॉ. निलेश चांडक होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मारोतीराव पोटे, सचिव संदीप कासार उपस्थित होते.
पुढे बोलताना संभाग कार्यवाह बलाकृष्ण प्रल्हाद खानवेलकर म्हणाले की, जनकल्याण समिती व सेवा भारतीत मातृशक्तीचे मोठे योगदान आहे. रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गुरूजींनी 33 वर्षात 65 वेळा जगभ्रमण केले. तयात त्यांनी समाज जागृती करून समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. हिंदू समाज जागृत झाला तर फार मोठे चांगले काम होत असल्याचे त्यांनी सांगीतले.

अध्यक्ष्ा म्हणून बोलताना डॉ. निलेश चांडक यांनी सैनिक जसे सीमेवर काम करतात तसे काम डॉक्टरांनी कोरोना काळात केले. कॅन्सरच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सामान्य रूग्णालयात यापुर्वी गेलो असता तेथील सुविधाचा वानवा आता दूर झालेला आहे. सामान्य रूग्णालयाने आता कात टाकत अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. महिला दिनाबाबत बोलताना डॉ. चांडक म्हणाले की, संस्काराचा पाया आई आहे. आई शिकलेली असेल तर पूर्ण परिवार शिकत असतो. आईचे आशीर्वाद असतील तर ती व्यक्ती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात यशस्वी होत असल्याचे सांगीतले.

प्रास्तावीक सेवालयाचे सचवि संदीप कासार यांनी केले. त्यांनी सेवालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देत सामान्य रूग्णालयातील गरजूंना जेवण पुरविण्याची सेवा करत असल्याचे सांगीतले. यातून समाजाचे दू:ख दूर करण्याचा प्रयत्न सेवालय करत असल्याचेही त्यांनी सांगीतले.
मृदूला कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. पिंप्राळाच्या बालसंस्कार केंद्राच्या मुलांनी गणेश वंदना सादर केली. सोमनाथ महाजन यांनी शंखनाद केला. महेद्र सुर्यवंशी यांनी वैयक्तीक गीत सादर केले. यावेळी सेवालयाचे विनोद कोळी, निलेश माळी, स्वप्नील चौधरी, रितश पवार यांच्यासह पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

या सेवावर्तींचा झाला सन्मान
समाजातील विविध घटकांसाठी सेवा देत त्यांना मानाचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या चाळीसगावच्या मिनाक्ष्ाी निकम, एरंडोलचे जय श्रीराम प्रतिष्ठान, पारोळ्याचे दिपक पिल्ले, कनाशीचे कैलास कोळी व पल्लवी कोळी यांचा सन्मानचिन्ह देवून मान्यवरांनी गौरव केला. सत्कारार्थीचा परिचय ॲड. अनघा नाईक यांनी करून दिला.