Jalgaon : वयाची साठी ओलांडलेल्या मित्रांची अर्धशतकानंतर पुन्हा भरली ला.ना.त शाळा

Jalgaon :  त्यांचे वय साठीत. चेहरे अन्‌‍ देहयष्टीही बरीचशी बदललेली. शाळा सोडल्यानंतर पुन्हा भेट होईल की नाही याची श्वाश्वती नाही. पण म्हणतात ना की मित्रत्वाच्या गाठी पक्क्या असल्या की त्या पुन्हा एकत्र येतात. त्यानुसारच वयाची साठी ओलांडलेल्या शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थी मित्रांनी पुन्हा एकदा शाळा भरवली तीही पन्नास वर्षानंतर.

 

जळगांव येथील ला.ना. सार्वजनिक हायस्कुल मध्ये 1973-74 वर्षामध्ये जुनी 11 वी  वर्गाचे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी जल्लोषात झाला. तब्बल 50 वर्षांनी एकत्र येणारे सर्वच मित्र 67-68 ह्या वयोगटातील आहेत. सर्वांच्या शरीरयष्टीत फरक पडल्याने एकमेकांना ओळखणेही थोडे कठीण झाले होते. या सर्वांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रथम सर्वांनी परीचय करुन दिला. दिवंगत शिक्षक व वर्गमित्रांना आदरांजली अर्पण केली.

 

या कार्यक्रमाचे नियोजन दोन महिन्यांपासून सुरु होते. सर्व माजी विद्यार्थ्यांना शोधणे, संपर्क करणे दिर्घ कालावधीमुळे अतिशय कठीण झाले. यातील काही सेवा निवृत्त आहेत तर काही आजही आपला व्यवसाय उत्तमरित्या नवी पिढीसोबत सांभाळत आहेत.

 

या मेळाव्यानिमित्त अभय बनवट, हेमंत रेदासणी, विरेंद्र लुंकड, डॉ. शेखर रायसोनी, हेमंत धर्माधिकारी (बदलापूर), अविनाश भोसले (नाशिक), गोपाल पलोड, जगदीश पलोड, अनिल कांकरीया, दिलीप गांधी, सुरेश पाटील, बलवंत ठोंबरे, जगदीश ऐदासाणी, संजय अजनाडकर, राजेंद्र काबरा, , ललीत डेंबला, प्रमोद कोगटा, अर्किटेक्ट शशिकांत कुलकर्णी, प्रकाश (बापु) चौधरी, डॉ. सुनिल कोल्हे, सुपडू चौधरी, जगदीश अग्रवाल, आदी हजर होते. अशोक चव्हाण यांनी ऑनलाईन उपस्थिती दिली.

 

शाळेतील जुन्या आठवणी काढून एकमेकांना चिडवणे, हास्यविनोद करणे, इ. प्रकारे बालपण आठविले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अभय बनवट, हेमंत रेदासाणी, विरेंद्र लुंकड आदींनी परीश्रम घेतले. ह्यापुढे दरवर्षी मेळावा घेण्याचे ठरले. सर्वच ज्येष्ठ नागरीक आहे. प्रकृतीच्या तक्रारी असतांना सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थिती दिल्याबद्दल एकमेकांचे आभार मानले.