---Advertisement---

Jalgaon: वहिनीवर दीराची वाईट नजर, पीडीतेच्या मुलाला पाणी घेण्यासाठी पाठवले अन्…

---Advertisement---

जळगाव : शेतशिवारात कामासाठी गेलेल्या महिलेचा दिरानेच विनयभंग केल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.  

पीडीत महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवार, 26 मे रोजी सकाळी 8.30 पीडीता व त्यांचा मुलगा शेतात काडी कचरा वेचून जाळण्यासाठी गेले होते. यावेळी पीडीतेच्या 13 वर्षीय मुलाला दिराने विहिरीवर पाणी घेण्यासाठी पाठवले व पीडीतेसोबत अश्लील संवाद करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

तसेच पीडीतेस लाथाबुक्यांनी मारहाण करत शिविगाळ करीत, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एएसआय जयवंद पाटील करीत आहेत.   

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment