Jalgaon : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मधील हिवाळी सत्राच्या परीक्षांचा निकाल घोषित झाला. त्यात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात समस्या आढळून आल्यात .
विद्यार्थ्यांनी निकाल रीड्रेसल ला टाकलेले असतांना सुद्धा त्यांचे निकाल न देता त्या विद्यार्थ्यांचे पुढील सत्राचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांसमोर द्विधा परिस्थिती निर्माण झाली.त्यातच विद्यापीठाने मोठ्या प्रमाणात परीक्षा शुल्कात वाढ केल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.त्यासोबत त्यांना मानसिक त्रासाला सुद्धा सामोरे जावे लागत आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगर तर्फे परीक्षा संचालकांना निवेदन देण्यात आले. विद्यापीठाने रिड्रेसल चे निकाल लवकरात लवकर घोषित करावे, पास झालेल्या विद्यार्थ्यांना 50% शुल्क परत करावे,परीक्षा अर्ज भरण्याची मुदत वाढवून विलंब शुल्क कमी करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरून दिलेले आहेत पम त्यांचा निकाल पास आहे,अश्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे,आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मागण्या पूर्ण न झाल्यास विद्यार्थी परिषदेकडून तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आला. प्रसंगी देवगिरी प्रदेश सहमंत्री वरुणराज नन्नवरे,महानगर मंत्री मयूर माळी, नगरमंत्री चिन्मय महाजन,गौरव राजपूत,शुभम तायडे,अनिकेत महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.