जळगाव : विनापरवाना रासायनिक खते व कीटकनाशके विक्री करत असल्याचा प्रकार कानळदा रोडवर, रोहनवाडी परीसरात २३ रोजी सकाळी साडेनऊ वाजता समोर आला. या प्रकरणी पाच जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यामुळे जिल्ह्यात खळबळ प्रचंड उडाली. संशयितांकडून 15 लाख 43 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील कानळदा रोडवर असलेल्या रोहनवाडी येथील रवींद्र चौधरी यांच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काहीजण विनापरवाना शेतीसाठी लागणारे खत पीकवाढ, संजीविके व कीटकनाशक शेतकर्यांना विक्री होत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांना मिळाली. जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांनी कारवाईच्या सूचना गुणवत्ता नियंत्रण पथकाला दिल्या. त्यानुसार पथकाने शुक्रवार, 23 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता पथकाने कारवाई करत छापा टाकला.
यावेळी विनापरवाना खत कीटकनाशक व संजीविके विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी महेश माटे (पिंप्राळा), देविदास भावसार (खोटे नगर अरविंद माचे, रा.महिसागर), निमेश भोई (जळगाव) यांच्या विरोधात शुक्रवार, 23 जून रोजी रात्री 9 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.