Jalgaon : सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवास आजपासून प्रारंभ

Jalgaon :   येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवास उद्या, 11 फेब्रुवारीपासून प्रारंभ करण्यात येत असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष्ा व माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, कार्याध्यक्ष्ा माजी महापौर जयश्री महाजन यांनी आज शनिवार,10 रोजी पद्मालय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सर्व जाती, धर्म व समूह, विविध विचार प्रवाह यांना सोबत घेवून जयंती साजरी करणे हे सार्वजनिक शिवजयंतीचे वैशिष्ट्य असल्याचे शभू पाटील यांनी सांगीतले.

आजपासून सुरवात

शिवजयंती महोत्सवास रविवार, 11 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. यात पिंप्राळा येथील छत्रपति शिवाजीर महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.

15 फेब्रुवारी रोजी किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात येणार आहेक. स्पर्धेतील सहभागींना बक्ष्ािसे व प्रमाणपत्रे देण्यात  येतील. किल्ले बनविण्यासाठी लागणारे साहित्य समितीतर्फे देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे पुरूषोत्तम चौधरी प्रमुख असतील. या तयार केलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन व महेश पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेले आरमार प्रदर्शन 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत भाऊंचे उद्यानासमोर काव्य रत्नावली चौकात सगळ्यांना पाहण्यासाठी खुले राहील.

17 फेब्रुवारी रोजी पिंप्राळा येथेे कीर्तन होईल. 18 फेब्रुवारी रोजी शालेय स्तरावरील मुलांसाठी रंगभरण स्पर्धा होईल. जैन उद्योग समुह व कला अध्यापक संघाचे यासाठी सहकार्य मिळाले आहे.

 

 19 फेब्रुवारी ला भव्य शोभा यात्रा

19 फेब्रुवारी ला सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयमपासून भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. समितीतर्फे महात्मा ज्योतीबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीदिनीही विविध कार्यक्रम होणार आहेत. 6 जून रोजी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी या महोत्सवाची सांगता होईल. या महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

 

या पत्रकार परिषदेला शंभू पाटील, राम पवार, दिलीप तिवारी, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, नंदु आडवाणी, पुरूषोंत्तम चौधरी, खुशाल चव्हाण यांच्यासह सर्व समितीचे सदस्य उपस्थित होते.

अध्यक्ष्ापदी कुलभुषण पाटील, कार्याध्यक्ष्ापदी जयश्री महाजन

सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष्ापदी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची तर कार्याध्यक्ष्ापदी माजी महापौर जयश्री महाजन यांची निवड करण्यात आली आहेत. उपाध्यक्ष्ापदी एजाज मलिक, नंदु आडवाणी, रजनीकांत कोठारी यांची निवड करण्यात आली आहे. तर सुकाणू समितीत प्रतिभा शिंदे, मुकूंद सपकाळे, डॉ.राधेश्याम चौधरी, मुरलीधर महाजन, दिलीप तिवारी, चंदन कोल्हे, रविंद्र भावसार, कल्पेश सोनवणे, संग्रामसिंह राजपूत, अश्विनी देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. तर पालकमंत्रॐी गुलाबराव पाटील, ना. गिरीश महाजन, ना. अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अशोक जैन हे समितीचे मार्गदर्शक आहेत.