जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सुमारे १०८ गावात ऐन पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे सुमारे १३८ टँकर येथील नागरिकांची तहान भागवत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी सांगितले. दरम्यान, जून महिना संपत आला तरीही जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दमदार पावसाअभावी काही भागात पेरण्याही खोळंबल्या आहेत.
जिल्ह्यातील १६६ गावातील १९१ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत, १० गावात १८ नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत, ४ गावात ६ कुपनलिका, विंधन विहिरींची दुरस्ती व खोलीकरण करण्यात येत आहे.
‘या’ गावांना टँकरने पाणीपुरवठा
चाळीसगाव तालुक्यात विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, कृष्णा नगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राह्मणशेवगे, घोडेगाव, हातगाव, भिल्लवस्ती, पिंप्री बु.प्र. दे., खराडी, डोणदिगर, तळेगाव, पिंपळगाव, माळशेवगे, शिंदी, चत्रभुज तांडा, शेवरी, बिलाखेड, शिरसगाव, जुनपाणी, तळोदे, चिंचगव्हाण, अभोणे दांडा, सुंदरनगर, नाईकनगर, भडगाव तालुक्यात तळबंद तांडा, वसंतवाडी, आंचळगाव, मळगाव, वडगाव बु. वस्ती, धोत्रे, पासर्डी, अमळनेर तालुक्यात तळवाडे, शिरसाळे बु. निसर्डी, लोणपंचम, नगाव खु., देवगाव देवळी, सबगव्हाण, भरवस, अंचलवाडी, आटाळे, पिंपळे खु. चिमणपुरी, डांगर बु., नगरव बु. आडी अनोरे, गलवाडे, लोणचारम तांडा, पिंपळे बु., चोपडाई, कावपिंप्री, कोंढावळ, फाफोरे बु., रणाईचे खु.बु., खर्दे व खेडी, खडके, वाघोदे, इंदापिंप्री, गलवाडे खु. मंगरुळ, धानोरा, जानवे, पारोळा तालुक्यात खेडीढोक, हणुमंतखेडे, कन्हेर, चहुत्रे/ वडगाव, मंगरुळ, भोंडणदिगर, वडगाव प्र. अ., सुमठाणे, पोपटनगर, धुळपिंप्री, भुसावळ तालुका कंडारी, कुहे प्र.न. जामनेर तालुक्यात रोटवद, मोरगाव, काळखेडे, एकुलती खु., वाडी, ओझर बु., हिंगणे न.क., वाकोद, जांभोळ, किन्ही, सोनारी, वाडीकिल्ला, नाचणखेडे, सावे, जळगाव तालुक्यात वराड, लोणवाडी बु, सुभाषवाडी, शिरसोली, कुसुंबे, वावडदा पाचोरा तालुक्यात खाजोळा, लोहारा, घुसडी, निंभोरी बु. रामेश्वर, बोदवड तालुक्यात चलचक्रबु, चलचक्र खु. आदी गावे टंचाईग्रस्त असून त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
२५ जूनअखेर पर्जन्यमान
जळगाव तालुका १३७.८ मिमी., भुसावळ तालुका१३०.९, यावल तालुका ७६.५ मिमी., रावेर तालुका ७१.४, मुक्ताईनगर १४०८.५ मिमी, अमळनेर तालुका १४०.३, चोपडा तालुका ४८.१ मिमी., एरंडोल तालुका १२६.१मिमी, पारोळा१०३.५, चाळीसगाव तालुका१४०.६ मिमी., जामनेर १३०.३मिमी., पाचोरा १७५.५, भडगाव १६२.६ मिमी., धरणगाव १३०.शममा. ५८.७मिमी., बोदवड७८.६ मिमी पावसाची नोंद अ असून जिल्ह्यात २५ जून अखेर ११७.२ मिमी पावसाची आवश्यकता असताना ११३.७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.