Jalgaon : महापालिकेच्या बायोवेस्ट प्रकल्पाला लागली आग

Jalgaon : उस्मानीया पार्कजवळ असलेल्या महापालिकेच्या मन्साई बायोवेस्ट प्रकल्पाला आज मंगळवार, 2 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजून 12 मिनीटांनी आग लागली. या आगीत प्रकल्प पूर्ण जळून खाक झाला आहे. रात्रीपासून आतापर्यत दहा गाड्यांनी आग विझवली असली तरी बायोवेस्ट (मेडीकल कचरा) असल्याने ही आग अजुनही धुसमुसत आहे.

आज पहाटे 1 वाजून 12 मिनीटांनी मन्साई बायोवेस्ट प्रकल्पावरील अभियंता शुभम पाटील यांनी आग लागल्याबाबत माहिती दिली. त्यानुसार तात्काळ अग्निशमनच्या 3 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात. त्यांनी आग विझवण्यास सुरवात केली. मेडीकल कचरा असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिक असल्याने आग चांगलीच भडकली होती. आगीच्या ज्वाला थेट पत्र्याच्या छतापर्यत पोहचल्या होत्या. पूर्ण प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

या घटनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

https://fb.watch/pjCbuuMh9b/

 

दहा बंबांनी आटोक्यात आणली आग
आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमनच्या एम एच 19 सीवाय 5857, 5860, 5861 या तीन बंबानी आगीवर पाण्याचे फव्वारे मारून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.परंतु आग विझत नसल्याने पुन्हा दुसरीकडून बंब मागविले. तब्बल 7 बंबांनी या आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र कचरा कारखाण्यात मेडीकल वेस्टमधील प्लॉस्टिक मोठ्या प्रमाणावर असल्याने आग अजूनही धुसफुसत होती. त्यामुळे पुन्हा दोन बंब पाठविण्यात आले.